नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीने भाजपाला ग्रा.पं.निवडणुकीतही धक्का दिला

नागपूर ग्रामीण तालुक्यात महाविकास आघाडीला चांगली कामगिरी करता आली नाही. तालुक्यात ११ ग्रा.पं.पैकी भाजपा (५), काँग्रेस (४), वंचित बहुजन आघाडीला एका ग्रा.पं.त यश मिळाले आहे. येथे बोलथी ग्रा.पं.मध्ये भाजपा समर्थित ग्राम विकास आघाडी पॅनेलचा ९ तर महाविकास आघाडी समर्थित पॅनेलचा ६ जागावर विजय झाला आहे.  सोनेगाव निपाणी ग्रा.पं.वर काँग्रेस समर्थित पॅनेलचा १६ तर भाजप समर्थित पॅनेलचा एका जागेवर विजय झाला आहे. सोनेगाव निपाणी येथील सत्ता कायम राखण्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती भारती पाटील यांना यावेळीही यश आले आहे.  येथे दवलामेटी ग्रा.पं.च्या १७ जागावर वंचित बहुजन आघाडी समर्थित पॅनेलला ७, भाजपा समर्थित पॅनेलला (५), कॉँग्रेस समर्थित पॅनेलला (३) तर दोन जागावर अपक्ष उमेदवारांना यश मिळाले आहे. सुराबर्डी ग्रा.पं.च्या ९ पैकी ९ जागावर भाजपा समर्थित गटाला यश मिळाले आहे. दृगधामना ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित गटाचे ७ तर भाजपा समर्थित गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. पेठ कालडोंगरी ग्रा.पं. ८ जागावर कॉँग्रेस समर्थित पॅनेलचा दमदार विजय झाला आहे.

सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी ग्रा.पं.यावेळीही राखण्यात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना यश आले आहे. येथे १७ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १४ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस समर्थित पॅनेलला १३ तर भाजप समर्थित पॅनेलला एका जागेवर यश मिळाले आहे.

कामठी तालुक्यातील कोराडी ग्रा.पं.राखण्यात भाजपाचे महामंत्री, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले आहे. येथे भाजपा समर्थित आर्दश ग्राम निर्माण आघाडीचा १७ पैकी १२ जागावर तर महाविकास आघाडीचा ५ जागांवर विजय झाला आहे. गतवेळी येथे भाजप समर्थित पॅनेलने १७ पैकी १७ जागावर विजय मिळविला होता. यावेळी कोराडीत काँग्रेसचे जि.प.सदस्य नाना कंभाले यांनी भाजपला काहीसा धक्का दिला आहे.

कळमेश्वर तालुक्यात ५ पैकी ४ जागावर काँग्रेस समर्थित पॅनेलचा विजय झाला आहे. येथे सोनपूर (आदासा) ग्रा.पं.निवडणूक बिनविरोध झाली होती. येथे सोनेगाव ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-७, भाजपा-२, कोहळी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-७, भाजपा-२ आणि दोन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. सेलू ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-५ तर भाजपा-४ आणि सावंगी ग्रा.प.मध्ये काँग्रेसच्या तिन्ही गटाला यश मिळाले आहे. रामटेक तालुक्यात ९ पैकी ७ ग्रा.पं.वर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.

नरखेड तालुक्यातील १७ ग्रा.पं.च्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस (महाविकास आघाडीने) मुंसडी मारली आहे. येथे महाविकास आघाडीला १५ तर भाजपाला २ ग्रा.पं.मध्ये यश मिळाले आहे. माणिकवाडा ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादी समर्थित पॅनेलचा ९ पैकी ६ जागावर विजय झाला आहे. येथे मदना ग्रा.पं.त शिवसेना समर्थित पॅनेलला यश मिळाले आहे. येथे ग्रामविकास आघाडीला ६ तर ग्राम परिवर्तन पॅनेलला एका जागेवर यश मिळाले आहे. जामगाव (खुर्द) ग्रा.पं.वर भाजपाने राष्ट्रवादी समर्थीत पॅनेलवर ८-१ विजय मिळविला आहे. जामगाव ग्रा.पं.मध्ये भाजप समर्थित पॅनेलने राष्ट्रवादी समर्थित ग्राम विकास आघाडीवर ८-१ विजय मिळविला आहे. सिंजर ग्रा.पं.मध्ये भाजप-शिवसेनेचा राष्ट्रवादीच्या ग्रामविकास आघाडीवर ४-३ ने विजय झाला आहे. सायवाडा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी समर्थित पॅनेलचा भाजप समर्थित पॅनेलचा ६-३ ने विजय झाला आहे. येरला इंदोरा ग्रा.पं.मध्ये परिवर्तन पॅनेलने जनजागृती पॅनेलवर ४-३ ने विजय मिळविला आहे. हे दोन्ही गट महाविकास आघाडीचे आहेत. महेंद्री ग्रा.पं.मध्ये जनशक्ती पॅनेलचा ग्राम विकास आघाडीवर ६-१ विजय झाला आहे. देवग्राम ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थित पॅनेलने भाजपाच्या ग्राम विकास परिवर्तन पॅनेलवर ८-१ ने विजय मिळविला आहे.

सावनेर तालुक्यात खुबाळा ग्रा.पं.च्या ९ जागापैकी ६ जागावर काँग्रेस समर्थित पॅनेल तर ३ जागावर भाजपा समर्थित पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. येथे माजी सरपंच यादव ठाकरे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. टेंभूरडोह ग्रा.पं.मध्ये कॉँग्रेस समर्थित गटाने ७ जागावर विजय मिळविला आहे. सोनपूर ग्रा.पं.च्या ७ पैकी ५ जागावर काँग्रेस समर्थित, एका जागेवर भाजपा समर्थित तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.  कामठी तालुक्यात महालगाव ग्रा.पं.च्या निकालात काँग्रेस समर्थीत गटाचे ४, भाजप समर्थीत गटाचे ३ तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. येथे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांना काँग्रेसने धक्का दिला आहे.

भांदेवाडा ग्रा.पं.मध्ये भाजपा समर्थित आदर्श महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. केसोरी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित पॅनेलने ७ ही जागावर विजय मिळविला आहे. खेडी ग्रा.पं.मध्ये भाजपा समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीचे ९ तर काँग्रेस समर्थित पॅनेलचा एका जागेवर विजय झाला आहे. टेमसना ग्रा.पं.मध्ये कॉँग्रेस समर्थित आघाडीचे ६, काँग्रेस बंडखोर गटाचे ३ उमेदवार विजयी झाले आहे. येथे भाजपा समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीला एकाही जागेवर यश मिळाले नाही. घोरपड ग्रा.पं.मध्ये भाजपा समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीचे ९ ही उमेदवार विजयी झाले आहे.

हिंगणा तालुक्यात सातगाव ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी समर्थित पॅनेलचा ७, भाजपा समर्थित पॅनेल (५), वंचित बहुजन आघाडी (२) तर एका जागेवर ईश्वर चिठ्ठीत भाजपा समर्थित पॅनेलच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.  पारशिवनी तालुक्यात दहाही ग्रा.पं.वर महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केले आहे. पारशिवनी तालुक्यातील बोरी (सिंगारदीप) ग्रा.पं.वर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. येथे सेना (३), काँग्रेस (३) आणि भाजपाचा (१) जागेवर विजय झाला आहे. खेडी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित पॅनेलला ६ तर भाजप समर्थित पॅनेलचा तीन जागावर विजय झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.