महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोल्हापूर : महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना कोल्हापुरातून समोर आली आहे. एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील साखरवाडी इथली ही घटना आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. ही विवाहित महिला दीड वर्षांच्या मुलीला घेऊन शेजारील घरात गप्पा मारण्यासाठी गेली असता तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. घरात कोणीही महिला नसल्याचं लक्षात आलं. पण तोच घरातील संशयित आरोपींनी तिचे हात खाटेला बांधून तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीनसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर विवाहितेवर बलात्कार करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलगाही असल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

या घटनेचा कोडोली पोलीस तपास करत असून पीडित महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचं सांगण्यात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही करणं आवश्यक आहे. दरम्यान, त्यांची दीड वर्षांची मुलगी सुखरूप आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून घरातील इतरांची चौकशी करत असल्याचं माहिती देण्यात आली आहे. (Maharashtra kolapur news Gang rape of a married woman case against two including a minor child)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.