Maharashtra Monsoon Session 2024 : ही 10 विधेयक मंजूर

0

Maharashtra Monsoon Session 2024 : राज्य विधिमंडळाचं शेवटचं अधिवेशनं शुक्रवारी (12 जुलै) संपलं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारनं 94 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या. तर दहा विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली.

दोन्ही सभागृहात संमत विधेयके : 10

(1) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(2) सन 2024 चे वि.प.वि.क्र.3- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग)

(3) महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2024 (वित्त विभाग)

(4) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन)

(5) महाराष्ट्र (द्वितिय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2024 (वित्त विभाग)

(6) महाराष्ट्र कर विषयक कायदे (सुधारणा) विधेयक, 2024 (वित्त विभाग)

(7) महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) विधेयक, 2024.

(8) महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे (स्थापना व विनियमन) विधेयक, 2024 (कौशल्य विकास व उद्योजकता विभाग)

(9) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) विधेयक, 2024 (नगर विकास विभाग)

(10) महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था (सुधारणा) विधेयक, 2024 (विधि व न्याय विभाग)