महाराष्ट्राचा मोस्ट एनर्जेटिक मॅन “प्लॅनेट टॅलेंट”मध्ये

मराठी मनोरंजनसृष्टीत “प्लॅनेट मराठी” सध्या आपल्या नवनवीन प्रोजेक्टची घोषणा करत प्रेक्षकवर्गात कमालीची उत्सुकता भरवत आहेत, त्याचप्रमाणेच त्यांच्या “प्लॅनेट टॅलेंट” या विभागामुळे तर चांगलीच चर्चा रंगली आहे; त्याचं कारण देखील तितकंच महत्वाचं आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील नावाजलेले चेहरे अमृता खानविलकर, निखिल चव्हाण, शिवानी बावकर,सायली संजीव तसेच लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव यांची जशी प्लॅनेट टॅलेंटमध्ये वर्णी लागली होती त्याचप्रमाणे मराठी तसेच हिंदी चित्रपटजगतात आपल्या दर्जेदार अभिनयाने छाप सोडणारा एनर्जेटिक कलाकार सिद्धार्थ जाधव आता प्लॅनेट टॅलेंटमध्ये दाखल झाला आहे.

“बकुळा नामदेव घोटाळे” या मराठी चित्रपटातून मराठी सिनेजगतात पाऊल ठेवणाऱ्या सिद्धार्थने आपल्या सर्वोत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. टेलिविजन, नाटके, चित्रपट असा प्रवास करत मराठीच नव्हे तर हिंदी, बंगाली अशा अमराठी भाषेतल्या चित्रपटांमध्ये काम करत सिद्धार्थने  मराठीचा झेंडा अटकेपार नेला. जत्रा, ये रे ये रे पैसा, दे धक्का, हुप्पा हुय्या, धुरळा इ. तसेच बॉलीवूड मध्ये गोलमाल, सिम्बा यातील त्याच्या भूमिका अधिकच लक्षणीय होत्या. अशा या हरहुन्नरी कलाकाराची प्लॅनेट टॅलेंटमध्ये एंट्री होणं हे मराठी रसिकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला “गुड न्यूज” पेक्षा कमी नाही.

प्लॅनेट मराठी हा दर्जेदार मनोरंजन करणारा एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, आणि त्यासोबतच प्लॅनेट टॅलेंट च्या वतीने अनेक सुप्रसिद्ध कलाकार मंडळी यात जोडली जात आहेत. त्यात सिद्धार्थ जाधवची एंट्री झाल्याने प्लॅनेट मराठीच्या कक्षा अधिकच मोठ्या झाल्या आहेत. याबाबत सिद्धार्थ म्हणतो, “माझी ओळख जी आहे ती फक्त आणि फक्त मराठी रंगभूमीमुळेचं आणि आज जरी मी बॉलिवूडमध्ये सिनेमे करत असलो तरीही माझ्यासाठी मराठी नाटकं, मराठी सिनेमा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहणार आहे. अमित भंडारी, प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर यांच्या सारख्या मराठी सिनेसृष्ठीसाठी नेहमीच झटणाऱ्या माणसांसोबत जोडलं जाणं यातच मला खूप मोठं समाधान आहे.”

सिनेमा, नाटक यांसोबत भविष्यात वेब सिरीजमध्ये झळकणारा सिद्धार्थ जाधव नेहमीच स्वतःच्या बाबतीत प्रयोगशील असल्याचं सांगतो.  कॉमेडी, ऍक्शन, रोमान्स, व्हिलन सगळेच जॉनर बखुबीने सादर करणारा सिद्धार्थ प्रत्येक भूमिकेत “परफेक्ट” असतो आणि म्हणूनच तो महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणूनही नावाजला जातो. असा हा अभ्यासू अभिनेता त्याच्या प्लॅनेट टॅलेंटमधील पदार्पणाबाबत देखील तितकाच उत्साही आहे.

मनोरंजन सृष्टीत पहिला मराठी ओटीटी म्हणून “प्लॅनेट मराठी”ची घोषणा झाली आणि हा ओटीटी प्लॅटफॉर्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  त्याचबरोबर हल्लीच लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव प्लॅनेट टॅलेंटचा भाग बनले आहेत आणि आता अभिनेता सिद्धार्थ जाधव प्लॅनेट मराठीच्या “प्लॅनेट टॅलेंट” कुटुंबात सहभागी झाला आहे. आजपर्यंत सिद्धार्थला रसिक प्रेक्षकांनी वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलं आहे परंतु प्लॅनेट टॅलेंटच्या निमित्ताने भविष्यात आम्ही त्याचे आणखी काही नवे पैलू लोकांसमोर आणण्यास प्रयत्नशील असू.  प्रेक्षकांनाही आमचा हा प्रयत्न नक्की आवडेल अशी मला खात्री आहे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.