महिंद्रा लाईफस्पेसेस ‘स्टे इन प्लेस फॉर्मवर्क’ करणारी देशातील पहिली कंपनी

मुंबई, 8 सप्टेंबर : महिंद्रा समूहाची बांधकाम व्यवसाय आणि पायाभूत सुविधा विकास शाखा असणाऱ्या महिंद्रा लाईफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड (एमएलडीएल)ने आज वेगाने बांधकाम पक्रिया पार पाडण्यासाठी आणि किंमत आणि गुणवत्ता व्यवस्थापन विकसन यासाठी विविध नवीन तंत्रज्ञानांचा अंगीकार करत असल्याचे जाहीर केले. या अग्रेसर तंत्रज्ञानाने बांधकाम क्षेत्राकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन दिला आहे आणि भारतीय बांधकाम व्यवसाय क्षेत्रात या नवीन साहित्य आणि तंत्राचा वेगाने अंगीकार होईल अशी अपेक्षा आहे. महिंद्रा लाईफस्पेसेसने या तंत्रज्ञानाचे सादरीकरण त्यांच्या पालघर (मुंबई महानगर विभाग) येथील ‘महिंद्रा हॅपीनेस्ट’ या प्रकल्पात मंगळवारी केले.

महिंद्रा लाईफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सुब्रमण्यन म्हणाले, “बांधकाम प्रक्रियेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करून सातत्याने गुणवत्ता परिमाणे आणि प्रक्रिया यांच्यात सुधारणा घडवत बांधकाम व्यवसाय विकासचक्रात असलेली नाविन्यपूर्णतेची दरी भरून काढणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. बांधकाम मूल्य साखळीत नवीन डिजिटल साधने आणि पद्धती यांचा अंगीकार केल्यास प्रकल्प अधिक वेगाने पूर्ण करणे आणि आमच्या ग्राहकांना अधिक चांगली मुल्याधीष्टीत सेवा देणे आम्हांला शक्य होईल. यामुळे पारदर्शकता अधिक मजबूत व्हायला आणि भागधारकांच्या समुहात सहकार्य वाढायला आणखी मदत होऊ शकेल.”

पालघर येथील महिंद्रा हॅपीनेस्ट मधील ऑन-साईट सादरीकरणात ‘रेबार ऑटोमेशन’च्या (बांधकामातील रोबोटिक्स) लाइव्ह डेमोचा समावेश होता. बांधकामासाठी लागणारा वेळ ठळकपणे कमी करण्याची क्षमता यामध्ये आहे. भारतीय बांधकाम व्यवसाय क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित इतर क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

काल्झेन रिअॅलीटीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कार्थिक कोडली म्हणाले, “भारतीय बांधकाम व्यवसाय क्षेत्रात स्टे इन प्लेस फॉर्मवर्क तंत्रज्ञान महिंद्रा लाईफस्पेसेसच्या सहकार्याने सादर करताना आम्हांला खूप आनंद होत आहे. भागधारक, व्यापार आणि प्रक्रिया या सर्वांमधील समतोल साधणे शक्य व्हावे यासाठी आमची सुविधा प्रत्यक्ष वेळेतील डिजिटल व्यासपीठावर संपूर्ण बांधकाम जीवनचक्राला जोडते. भारतातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील सर्वाधिक विश्वासार्ह ब्रँडपैकी एक असणाऱ्या ब्रँडने काल्झेन सुविधांचा अंगीकार करणे याचा बांधकाम उद्योगावर सकारात्मक परिणाम होईल.”

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.