विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी मनोहर म्हैसाळकर यांची तिसऱ्यांदा निवड 

Share This News

वैदर्भीय साहित्यिकांची पालक संस्था अशी विदर्भ साहित्य संघाची ओळख आहे. येत्या २0२३ मध्ये विदर्भ साहित्य संघाला १00 वर्षे पूर्ण होत आहे.  एक अध्यक्ष आणि २२ सदस्य अशी विदर्भ साहित्य संघाची कार्यकारिणी असते. मात्र, निवडणुकीत केवळ २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे अध्यक्ष वगळल्यास इतर कार्यकारिणीची निवड कोणत्याही निवडणुकीविना होणार हे निश्‍चित झाले होते. अध्यक्षपदासाठी मनोहर म्हैसाळकर यांच्यासह सतीश तराळ यांनीही अर्ज दाखल केला होता. त्यामुळे दावे-प्रतिदावे केले जात होते. मात्र शेवटच्या दिवशी तराळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता निवडणुकीची पुढील कार्यवाही स्थगित झाली. मंगळवारी नव्या कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांची घोषणा होणार असल्याचे सांगितले जात आहे. विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील जुनी आणि मोठी साहित्य संघटना असून १९२३ रोजी अमरावती येथे स्थापना करण्यात आली होती. मार्च १९५0मध्ये तिचे मुख्य कार्यालय नागपूरला हलवण्यात आले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.