९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान नाशिकला

Share This News

नाशिक,दि.८ जानेवारी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरातच होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे संमेलन होणार आहे. संमेलनाच्या निश्चित तारखा नाशिककरांशी चर्चा करून नक्की करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी साहित्य महामंडळाच्या स्थळनिवड समितीने नाशिक येथील एकाच संस्थेला निमंत्रण पाहणीसाठी निवडले आणि त्याला भेट देऊन आवश्यक ती पाहणी केली आणि आपला अहवाल महामंडळाला दिला.नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. ९४ व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचे (दिल्लीसाठी) एक आणि अंमळनेरचे एक अशी निमंत्रण आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठविले होते. या फेर निमंत्रणात सरहदन मे महिन्यात दिल्लीत संमेलन देण्याची मागणी केली होती. साहित्य महामंडळाने स्थळनिवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमत: नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष यांनी अवधी कमी असल्यामुळे साहित्य महामंडळाच्या बैठकीसाठी मोठा वेळ जाईल म्हणून स्थळ निवड समितीच्या शिफारशीची प्रत सर्व सदस्यांना पाठवावी आणि त्याच वेळी स्थळनिवड समितीचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सर्व मराठी जनतेसाठी संमेलन स्थळाची घोषणा करावी असे ३ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीत ठरले. त्यानुसार समितीच्या व साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला आयोजित केले जाईल अशी घोषणा केली आणि नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारले असल्याचे महामंडळाच्या वतीने स्पष्ट केले


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.