अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार Mass abuse of a minor girl

रामटेक : गावातील आटाचक्कीवर दळण घेऊन गेलेल्या १४ वर्षीय मुलीला बळजबरीने माेटारसायकलवर खिंडसी परिसरात नेऊन तिच्यावर पाच जणांनी सामूहिक पाशवी अत्याचार केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. पीडितेसह तिच्या कुटुंबीयांनी शनिवारी रामटेक पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविल्याने पाेलिसांनी पाचही आराेपींना अटक केली. अतुल विश्वनाथ हटवार (२५, रा. आंधळगाव, जि. भंडारा), धीरज जयराम मेहरकुळे (३८), सौरभ दिलीप मेहरकुळे (२३), हर्षल राजू मेहरकुळे (२१) व होमदास ताराचंद मेहरकुळे (४० चाैघेही रा. दुधाळा, ता. रामटेक) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. पीडित मुलगी मंगळवारी आटाचक्कीवर गेली असताना तिचे आईवडील त्यांच्या मूळ गावी गेले हाेते. चक्कीवर गर्दी असल्याने ती नाेटबुक आणण्यासाठी घराकडे परत येत असताना अतुलने तिला वाटेत अडविले आणि बळजबरीने माेटारसायकलवर बसविले. त्याने तिला खिंडशी शिवारात नेले. अतुलने तिथे इतर चाैघांनाही बाेलावले. या पाचही जणांनी तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला. दरम्यान, आई-वडील घरी परत आल्यानंतर त्यांनी मुलगी दिसली नाही.

 त्याचवेळी ती रडत दुसऱ्याच्या मदतीने घराकडे जात हाेती. तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. पाचही आराेपीस अटक आराेपींची दहशत आणि बदनामीपाेटी त्यांनी तत्काळ पाेलिसांत तक्रार दाखल केली नाही. नागरिकांनी त्यांना धीर दिला. त्यामुळे त्यांनी शनिवारी पाेलिसांत तक्रार दाखल केली. रामटेक पाेलिसांनी भादंवि ३६३, ३७६ (ड), ३७६ (अ),  ॲट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा नाेंदवून पाचही आराेपीस अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.