औषध आणि काळजी हाच नववर्षाचा मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) गुजरातच्या राजकोट एम्सच्या पायाभरणी कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. आधी मी म्हणत होतो की जेव्हापयर्ंत औषध नाही तेव्हापयर्ंत निष्काळजीपणा नाही, आता आपला २0२१ चा मंत्र असेल औषधही आणि काळजीही, असे म्हणत नव्या वर्षात आशेचा किरण दिसत असल्याचे म्हटले. २0२0 आरोग्याच्या बाबतीत अभूतपूर्व वर्ष ठरल्याचे यावेळी पंतप्रधानांनी म्हटले. सोबतच आरोग्य हीच संपदा असल्याची शिकवण या वर्षाने दिल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
राजकोटचे एम्स आरोग्याशी संबंधित मुलभूत सुविधा व वैद्यकीय शिक्षणाला चालना देईल. तसेच गुजरातमध्ये रोजगार संधी आणेल. पाच हजार थेट नोकर्‍या तर अगणित अप्रत्यक्ष रोजगार संधी मिळतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी राजकोट एम्सचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गुजरातने कोविडशी लढण्याचा मार्ग दाखवला. गुजरातने उत्तमप्रकारे कोरोना आव्हान हाताळले, याचे श्रेय त्यांनी गुजरातच्या मजबूत वैद्यकीय मुलभूत सुविधा व्यवस्थेला दिले. गुजरातच्या वैद्यकीय क्षेत्राला लाभलेले हे यश दोन दशकांचा अविरत पर्शिम, सर्मपण आणि निर्धाराचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एवढी दशके उलटूनही देशात फक्त ६ एम्स आहेत, असे ते म्हणाले. अटलजींच्या २00३ मधील सरकारने अजून ६ मोठी एम्स स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. गेल्या सहा वर्षात १0 नवी एम्स सुरू झाली आणि काहींचे उद््घाटनही झाले. एम्सशिवाय काही सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची उभारणी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वर्ष २0१४ पूर्वी आपल्या आरोग्यव्यवस्थेचे  विविध घटक विविध दिशांनी आणि वेगवेगळी उद्धिष्टे ठेवून काम करत होते, २0१४ नंतर आरोग्य यंत्रणा समग्रपणे काम करू लागली आणि आधुनिक औषधोपचार पद्धतीला प्राधान्य देतानाही प्रतिबंधात्मक उपायांवर भर देऊ लागली. सरकारने गरिबांवरील औषधोपचाराच्या किंमती कमी केल्या आणि त्याच वेळी वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या वाढवली असे त्यांनी सांगितले. आयुष्मान भारत योजनेखाली दुर्गम भागांमध्ये १.५ दशलक्ष आरोग्य केंद्र व वेलनेस केंद्रे उभारण्याचे काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. यापैकी ५0 हजार केंद्रे सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. यापैकी पाच हजार एकट्या गुजरातमध्ये आहेत. सात हजार जन औषधी केंद्रे ३.५ लाख गरीब रुग्णांना कमी किमतीतील औषधे पुरवतात, असे त्यांनी सांगितले. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने घेतलेल्या पुढाकाराबद्दलही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, २0२0 हे आरोग्य आव्हानांचे वर्ष होते तर २0२१ हे आरोग्यविषयक समस्यांच्या सोडवणुकीचे वर्ष असेल. भारताने ज्याप्रमाणे आरोग्य आव्हानांचा सामना करताना महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचप्रमाणे आरोग्य समस्यांचे निराकरण करतानाही बजावेल असे ते म्हणाले. जग सजगतेने आरोग्य सुविधांकडे पाहील. आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी २0२१ मधील भारताचे योगदान हे या समस्येच्या प्रमाणात महत्वाचे ठरेल, असेही ते म्हणाले. भारतातील वैद्यकीय व्यावसायिकांना ज्ञान आणि सेवेसाठी प्रोत्साहन दिल्यास तसेच मोठ्या प्रमाणावरील लसीकरण याद्वारे भारत जगापुढे सुलभ आणि किफायतशीर आरोग्यसेवेचे उदाहरण ठेवेल, असे ते म्हणाले. हेल्थ स्टार्टअप्समुळे आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते आणि त्यासंबंधित तंत्रज्ञानामुळे आरोग्य व्यवस्था सर्वांपयर्ंत पोहोचते. भारत हा भविष्यातील आरोग्य आणि आरोग्यातील भविष्य या दोहोंमध्येही महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मोदींनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, आजार हे सुद्धा जागतिक होत आहेत, जागतिक आरोग्य प्रश्नांवर जागतिक पातळीवरील उत्तर शोधण्याची हीच योग्य वेळ आहे. भारताने जागतिक पटलावर हे केले आहे. गरजेनुसार जुळवून घेण्याची, रुजण्याची व विकसित होण्याची आपली क्षमता भारताने सिध्द केल्याचे त्यांनी सांगितले. भारताने जगासोबत पावले टाकली आणि एकत्र प्रयत्नांमध्ये आपले योगदान दिले. भारत हा जागतिक आरोग्याचा केंद्रबिंदू म्हणून वेगाने प्रगती करत आहे. २0२0 मध्ये आपल्याला भारताची ही भूमिका अजून मजबूत करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.