मुंडन आंदोलन करून विदर्भवाद्यांनी व्यक्त केला संताप

पुरूष व महिलांनी मुंडन करीत सरकारला वाहिली श्रद्धांजली

 • विदर्भवाद्यांच्‍या ठिय्या आंदोलनाला तिस-या दिवशी घेतले वेगळे वळण
  नागपूर, ११ ऑगस्ट
  मागील तीन दिवसांपासून इतवारी शहीद चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सुरू असलेल्‍या ठिय्या आंदोलनाला आज वेगळे वळण मिळाले. शासनातर्फे हे आंदोलन दडपण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू असून या प्रवृत्तीच्या निषेधार्थ आज तिसèया दिवशी विदर्भ चंडिकेसमोरील सभामंडपात महिला व पुरुष कार्यकर्त्‍यांनी मुंडन करुन शासनाप्रती आपला रोष प्रकट श्रद्धांजली वाहिली.
  विदर्भ राज्‍य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडीच्या रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर, यांच्‍या नेतृत्‍वात आज तिस-या दिवशीही आंदोलनात मोठ्या संख्‍येने विदर्भवादी सहभागी झाले होते.
  पहिल्या दिवशी याचठिकाणी आंदोलनाचा शुभारंभ झाला, त्यानंतर दुसèयाच दिवशी पोलिसांनी राम नेवले, वामनराच चटप यांच्यासह प्रमुख कार्यकत्र्यांना अटक केली आणि आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. नेते व कार्यकत्र्यांची सुटका झाल्यानंतर आज सकाळपासून मोठ्या संख्येत कार्यकर्ते गोळा झाले, आणि आठ महिलांनी स्वत:चे केस दिले तर ९ युवा कार्यकत्र्यांनी मुंडन करुन आपली विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे यासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली.
  आजच्या आंदोलनात मुकेश मासुरकर, अरुण केदार, नरेश निमजे, प्रशांत मुळे, सुदाम राठोड, विजय मोंदेकर, अशोक पटले, प्रफुल्ल बोबडे, अजय साहू यांनी स्वत: मुंडन करवून घेतले. यासोबतच सुनीता येरणे, रेखा निमजे, ज्योती खांडेकर, वीणा भोयर, उषा लांबट, शोभा येवले, जया चातूरकर व कृष्णाबाई मोहबिया यांनी केश दान केले.
  यासंदर्भात बोलताना राम नेवले यांनी, स्वतंत्र विदर्भासाठी मागील आठ वर्षापासून आम्ही आंदोलन करीत आहोत. भाजपासह सर्व पक्षांनी विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तीन नवी राज्ये केंद्र शासनाने दिलीत पण विदर्भाचा मुद्दा अजूनही तसाच पडून आहे. त्यामुळे केंद्र सरकार अस्तित्वातच नाही, आणि हे सरकार मृतप्राय झाले असल्याने आम्ही आज मुंडन आंदोलन केले असल्याचे सांगितले.
  दुसरी मागणी म्हणजे कोरोना काळात वीजबिल माफ करावे अशी आहे पण मुख्यमंत्री ठाकरे, पालकमंत्री राऊत यांनी ३० टक्के वीज बिल माफ करण्याचे आश्वासन देऊन देखील त्याची पूर्तता केलेली नाही. त्यासाठी देखील निषेध म्हणून मुंडन आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले.
  या आंदोलनासाठी विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमधून कार्यकर्ते व पदाधिकारी आले आहेत, त्यांचा आंदोलनात सहभाग आहे. या आंदोलनातील कार्यकत्र्यांचे भोजनाची व्यवस्था इतवारी बाजारपेठेतील व्यावसायिकांनी केलेली आहे. हे आंदोलन स्वातंत्र्यदिनापर्यंत सुरूच राहणार असून त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कार्यकारी समितीची बैठक होईल व त्यात पुढील रुपरेषा ठरेल असेही राम नेवले यांनी यावेळी सांगितले
  ……….
  आंदोलनाला मिळते आहे सहकार्य
  मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्‍या या आंदोलनाला अनेकांचे विविध प्रकारे सहकार्य मिळत आहे. मिरची व्‍यापारी राकेश भावलकर, किराणा मर्चंट असोसिएशनेच अध्‍यक्ष प्रकाश गोयल व सचिव शिवकुमार सिंह, स्‍टील चेंबर ऑफ कॉमर्स माहेश्‍वरी धर्मशाळाचे अध्‍यक्ष राधेश्‍याम सारडा यांची भरपूर मदत झाली. विदर्भवाद्यांचे हे आंदोलन आणखी काही दिवस चालणार असल्‍यामुळे विदर्भप्रेमींनी पुढे यावे आणि सढळ हस्‍ते आंदोलनाला मदत करावी, असे आवाहन राम नेवले, वामनराव चटप यांनी केले आहे
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.