मेक्सिकोत भूकंपाचे धक्के, जीवितहानी नाही

8 सप्टेंबर : दक्षिण मेक्सिकोमध्ये अॅकापुल्कोच्या रिसॉर्टजवळ मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ७ ते ७.४ रिश्टर स्केल असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू रिसॉर्ट शहरापासून ४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुएरेरो राज्यातील पुएब्लो मॅडेरोच्या पूर्व-केंद्रस्थानी होता. भूकंपाची तीव्रता इतकी होती की मेक्सिको शहरातल्या २०० मैलांवरच्या इमारतीही हादरल्या. भूकंपानंतर येथील परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.