मॉक ड्रिलदरम्यान मंत्र्यांचे निधन

मॉस्को
मॉक ड्रिल करताना एका मंत्र्याला आपले प्राण गमवावे लागले आहे. रशियाचे आपात्कालीन मंत्री येवगेनी जिनिचेव यांचे एका मॉक ड्रिल दरम्यान झालेल्या अपघातात निधन झाले. या मॉक ड्रिल दरम्यान कॅमेरामनला वाचवण्यासाठी प्राण पणाला लावले होते. रशियन राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी ही माहिती दिली.
रशियन राष्ट्रपती कार्यालय क्रेमिलनने दिलेल्या माहितीनुसार, आपात्कालीन मंत्री येवगेनी जिनिचेव यांचे आर्कटिकमध्ये निधन झाले.
आर्कटिक भागामध्ये आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर सुरू असलेल्या मॉक ड्रिलमध्ये ते सहभागी झाले होते. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या मॉक ड्रिलच्या वेळी एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात येत होते. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, रशियाचे आपात्कालीन मंत्री येवगेनी जिनिचेव एका कड्याजवळ उभे होते. त्याच वेळेस कॅमेरामनचा पाय घसरल्याने पडला. त्याला वाचवण्यासाठी जिनिचेव यांनी पाण्यात उडी घेतली. याच दरम्यान ते एका खडकाला आदळले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आपात्कालीन सेवेत हेलिकॉप्टरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. जिनिचेवचा जन्म १९६६ लेनिनग्राडमध्ये झाला होता. सन १९८७ मध्ये रशियन गुप्तहेर संघटना केजीबीमध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. रशियाचे विद्यमान राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासह अनेक परदेश दौरेही केले आहेत.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.