दिव्यांग अहमद शेख यांचे सारथी बनले आमदार पारवे

सायकल रिक्षा चालविताना अपघातात पायाला जबर मार लागल्याने अपंगत्व आलेल्या उमरेड येथील रिक्षा चालक अहमद शेख यांना उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चातून ई-रिक्षा भेट दिला. यावेळी शेख यांना कुटुंबीयांसह ई-रिक्षातून आमदारांनी फेरफटका मारून आले. त्यांच्या कार्याबद्दल अपंग रिक्षाचालक अहमद शेख यांचे आमदार सारथी झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती.

 अस्थिव्यंग या वर्गातील दिव्यांगांना मोफत मोटाराईज ट्रायसायकल वाटपासाठी तपासणी शिबिरात आमदार राजू पारवे यांच्या उमरेड विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी आरोग्य तपासणी, दिव्यांगांना मोफत मोटार ट्राय सायकल वाटप, ई- रिक्षा वाटप आदी सामाजिक कार्यांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजनाकरिता सत्यम दिव्यांग मंच यांनी सहकार्य केले. या तपासणी शिबिरात मोटाराईज ट्रायसायकलसाठी एकूण ८३ दिव्यांग लाभार्थी पात्र ठरले आहे. यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवून एडीआयपी, राष्ट्रीय वयोश्री व राज्य शासनातर्फे उमरेड मतदार संघातील हजारो दिव्याग, ज्येष्ठ नागरिक, कर्णबधिर विद्यार्थी व नागरिकांना वरील योजनेतून मोफत साहित्य वाटप करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याने उमरेड विधानसभा मतदार संघातील सर्व प्रवर्गातील दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनी लाभासाठी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी आमदार राजू पारवे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.