मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस- यशोमती ठाकूर

नंदुरबार केंद्रातील भाजप सरकार हिंदूविरोधी असून भगवा ही कोणा पक्षाची जहागीर नाही. नरेंद्र मोदी हे देशाला लागलेली व्हाईट फंगस आहे, अशा शब्दात काँगेस नेत्या आणि महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसतर्फे नंदुरबारमध्ये ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या.

नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या वतीने नंदुरबारमध्ये व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमातून स्वातंत्र्यसैनिकांचा आणि त्यांच्या कुुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला.नंदुरबारमधील शहीद शिरीष कुमार यांनी आणि त्यांच्या साथीदारांना अभिवादन करण्यात आलं. त्यासोबतच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाला यशोमती ठाकूर आणि के. सी. पाडवी यांनी यायला उशिर केल्यामुळे दोन तास स्वातंत्र्यसैनिक ताटकळत पडले होते.

दरम्यान, या कार्यक्रमावेळी बोलताना ठाकूर यांनी मोदींवर केलेल्या टीकेवर भाजप काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.