धान खरेदीत 16 टक्क्यांहून अधिक वाढ

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत खरीप 2020-21 च्या चालू हंगामात 05.09.2021 पर्यंतची 889.62 लाख मेट्रिक टन धान खरेदी (खरीप पीक 718.09 लाख मेट्रिक टन आणि रब्बी पीक 171.53 लाख मेट्रिक टन समाविष्ट आहे) झाली असून गेल्या वर्षी 764.39 लाख मेट्रिक टन खरेदी करण्यात आली होती.

यामुळे रुपये 1,67,960.77 च्या एमएसपी मूल्यासह चालू असलेल्या खरीप विपणन हंगाम खरेदी व्यवहारातून सुमारे 130.47 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. खरीप विपणन हंगाम 2019-20 मध्ये 773.45 लाख मेट्रिक टनच्या मागील उच्चांकापेक्षा धान खरेदी आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे.

गहू खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये रब्बी विपणन हंगाम 2021 – 22 चा विपणन हंगाम संपला आहे. आतापर्यंत (18.08.2021) मागील वर्षाच्या 389.93 लाख मेट्रिक टन च्या खरेदीच्या तुलनेत 433.44 लाख मेट्रिक टन गहू खरेदी केला गेला आहे, (जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे, कारण तो रब्बी विपणन हंगाम 2020-21 च्या 389.93 लाख मेट्रिक टन मागील उच्चांकापेक्षा जास्त आहे). सुमारे 49.20 लाख शेतकऱ्यांना रुपये 85603.57 कोटी च्या एमएसपी मूल्यासह चालू असलेल्या रब्बी विपणन हंगाम खरेदीतून यापूर्वीच लाभ झाला आहे.

पीक वर्ष 2020 – 21 साठी ज्यात खरीप 2020 – 21 , रबी 2021 आणि उन्हाळी 2021 हंगाम समाविष्ट आहेत, सरकारने आपल्या नोडल एजन्सीजच्या माध्यमातून 11,99,713.15 मेट्रिक टन डाळी आणि तेलबिया खरेदी केल्या आहेत, ज्याचे एमएसपी मूल्य 6,742.51 कोटी रुपये आहे, ज्यामुळे 05-09-2021 पर्यंत तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, तेलंगणा, हरियाणा, ओडिशा आणि राजस्थान मधील 7,02,368 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.