लाॅकडाउनमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक दागिन्यांची खरेदी Most jewelery purchases in Maharashtra in lockdown

Share This News

बेंगळुरू : काेराेना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लाॅकडाउनचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. या कालावधीत साेने आणि चांदीचे भाव माेठ्या प्रमाणात वाढले. तरीही २०२० मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक साेने खरेदी झाली आहे. फिनटेक स्टार्ट-अपच्या ‘एमएसएमई’ निर्देशांकातून ही माहिती मिळाली आहे.  एका स्टार्टअपने भारताच्या एमएसएमई विभागाच्या क्रेडिट आणि वसुलीचे व्यवहार दर्शवणाऱ्या एमएसएमई निर्देशांकाच्या पहिल्या आवृत्तीचे नुकतेच अनावरण केले. त्यातून विविध क्षेत्रांतील व्यवहार तसेच क्रेडिट आणि क्रेडिट वसुलीची माहिती देण्यात आली आहे. एमएसएमई हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. याच क्षेत्राला काेराेनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काेराेना काळात साेन्याचे दर बरेच वाढले.

याच काळात अनेकांचे उत्पन्नही कमी झाले हाेते, तरीही सणासुदीच्या काळात महाराष्ट्रामध्ये साेने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी ३० टक्क्यांनी वाढली आहे. ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर या कालावधीत ही वाढ नाेंदविण्यात आली आहे. तसेच गुजरातमध्ये वस्त्र खरेदीत माेठी वाढ नाेंदविण्यात आली. गेल्या वर्षी गुजरातमध्ये वस्त्राेद्याेग ९ टक्क्यांनी वाढला आहे. लाॅकडाउनमुळे प्रभावित झालेल्या ‘एमएसएमई’ क्षेत्रातील क्रेडिट वसुलीतही वर्षअखेरीस सुधारणा दिसून आली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.