भारतीय सैन्य आणि बँक ऑफ बडोदामध्ये सामंजस्य करार

Share This News

नवी दिल्ली, नवीन ‘बडोदा सैनिकी वेतन पॅकेज’ साठी भारतीय सैन्याने बँक ऑफ बडोदाशी सामंजस्य करार केला आहे. सामंजस्य करारावर लेफ्टनंट जनरल रवीन खोसला, डीजी (एमपी अँड पीएस) आणि विक्रमादित्य सिंह खिची, कार्यकारी संचालक, बँक ऑफ बडोदा यांनी स्वाक्षरी केली. लेफ्टनंट जनरल हर्षा गुप्ता, एडजुटंट जनरल, इंडियन आर्मी यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. गुप्ता यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. बँक ऑफ बडोदा कडून भारतीय सेनेतील सेवेत असणाऱ्या आणि सेवानिवृत्त जवानांना बँकिंग सेवा कोणत्या आधारावर दिल्या जातील यावर सामंजस्य करार केला आहे. ‘बडोदा सैन्य वेतन पॅकेज’ अंतर्गत भारतीय सेनेच्या सेवेतील आणि सेवानिवृत्त जवानांना सेवा दिल्या जातील. बँकेच्या 8,200 पेक्षा जास्त देशांतर्गत शाखा आणि सुमारे 20 हजार व्यवसाय प्रतिनिधी टचपॉइंट्सच्या माध्यमातून या सेवा दिल्या जातील. या पॅकेजमध्ये वैयक्तिक अपघात विमा संरक्षण, कायमस्वरुपी अपंगत्व कवच, आंशिक अपंगत्व संरक्षण आणि मोठ्या प्रमाणावरील विमान अपघात विमा संरक्षण तसेच सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च शिक्षण संरक्षण यांचा समावेश आहे. पॅकेज अंतर्गत इतर सवलती देखील आहेत. यामध्ये सर्व बँक एटीएमवर अमर्यादित नि: शुल्क एटीएम व्यवहार, किरकोळ कर्जात विविध सेवा शुल्कावरील सवलत, आरटीजीएस / एनईएफटीमार्फत मोफत रेमिटन्स सुविधा, मोफत डिमांड ड्राफ्ट / बँकर चेक, लॉकर भाड्यात बरीच सूट आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.