खासदार धानोरकर स्वत:च्या वाहनाने शिरले ताडोब्यात

Share This News

MP Dhanorkar entered Tadoba in his own vehicle

चंद्रपूर : परवानगी नसतानाही खासदार बाळू धानोरकर स्वत:च्या वाहनाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात शिरल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. शनिवार, २० फेब्रुवारीला दुपारी हा प्रकार घडला. खासदार धानोरकर यांनी कोअर झोनमध्ये स्वत:च्या वाहनाने प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यासोबत वनक्षरक्षकाला पाठविण्यात आले होते.
खासदार बाळू धानोरकर हे त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासमवेत दुपारी तीनच्या सुमारास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या
मोहरली गेटवर पोहोचले. स्वतःच्या वाहनाने उद्यानात प्रवेश करण्याची त्यांनी मागणी केली. गेटवर उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की त्यांना आत जायचे असेल तर पर्यटक जिप्सी वाहनातून जाणे आवश्यक आहे. पण खासदारांनी आग्रह धरला. त्यामुळे अधिकारी हतबल झालेत. अखेर धानोरकर यांना स्वत:च्या वाहनांमध्ये उद्यानच्या आत जाण्याची परवानगी मिळाली. त्यांचे अंगरक्षक आणि शस्त्रे गेटवरच ठेऊन संचालकांनी धानोरकर यांना उद्यानात आत जाण्यासाठी वनरक्षक दिला. धानोरकर दाम्पत्य उद्यानात सुमारे दोन तास थांबले होते. सफारीसाठी नव्हे तर प्रकल्पातील विविध विकास कामे बघण्यासाठी धानोरकर गेल्याचे समोर येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.