तलवारीच्या धारेवरची मुलायम नाती.

रक्ताची नाती अतूट असतात, असे म्हणत असतानाच त्या नात्यांचे भावबंध किती तकालदू असतात याचा जिवंत प्रत्यय आम्ही सतत घेत असतो. रक्तापेक्षा अश्रूंची नाती जास्त संपृक्त आणि मजबूत असतात. रक्ताचे आपलग गट असतात आणि नैसर्गिकख मर्यादा आणि भूकांपासून रक्त दूर राहू शकत नाही. ते हिंसकच असते. अश्रूंचे तसे नसते. रक्तपातापेक्षाही अश्रूपात जास्त भयानक असतो. उत्तर प्रदेशातील यादवांच्या कुटुंबात भाऊबंदकीतून रक्तपात  झालेला नसला तरी अश्रीपात नक्कीच झालेला आहे. मुलायमसिंह यादवांची समाजवादी पार्टी ही तिथे सत्तेत आहे आणि येत्या काळात सत्ताकारणावर त्यांचा प्रभाव राहणारच आहे त्यामुळे त्यांची भांडणे कौटुंबिक असली तरीही त्याला सत्तेतील वाट्याची किनार आहेच. नव्हे; तेच मूळ कारण आहे.

या सार्‍याचा उत्तर प्रदेशच्या राजकारणावर म्हणूनच पर्यायाने जनमानसाच्या जगण्यावर पडणार आहे. कारण राजकारणी सत्ता राखण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरत असतात. अमेरिकेसारख्या जगात पहिल्या क्रमांकाच्या उच्चभ्रूंच्या देशात तिथल्या अध्यक्षिय निवडणुकीत खूप खालची पातळी गाठली गेलेली आहे. हा तर भारत आहे. तिथे राजकारण जाती अन् धर्माच्या आधारावर खेळले जाते. त्यामुळे तुटल्याने खचत चाललेली सपा पुन्हा एकदा मुस्लिम कार्डाचा वापर करू शकते. आझम खान सारखा त्यांचा धर्मांध नेता त्यासाठी त्याच्या शस्त्रांना जहराचा लेप लावूनच तयार आहे. अमरसिंह याच्या सारखा कुळबुडव्या उपटसुंभ नेता स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ सत्ताधारी यादवांचे कुटुंबच वेठीस धरील, असे नाही तर तो देशाची एकता- अखंडताही धोक्यात आणू शकतो. या दोघांचाही अखिलेशला विरोध आहे. याचा अर्थ त्यांना काका शिवपालचे भले हवे आहे असे अजिबात नाही. मुलामसिंह आता पूर्ण थकले आहे, सक्रिय राजकारणात त्याची ही अखेरची निवडणूक ठरू शकते. एखाद्या tqU;k वाड्यासारखी सपाची गत झालेली आहे. ऐन पंचविशीत वृद्धांच्या हाती पक्षाच्या दोर्‍या असल्याने भवितव्यात कोण, असा सवाल निर्माण झाला आहे. ज्ाुन्या वाड्यात म्हातारे माय-बाप असतात तोवरच मुलं थांबलेली असतात. ते गेले की बिल्डरशी सौदा करून निवासी गाळे पाडले जातात. सपाचेही तसेच झालेले आहे. मुलायमसिंहांच्या नंतर सपा कुणाची, हा खरा सवाल आहे. त्यासाठी ही भांडणे आहेत. त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीनंतर पक्षाच्या नेतृत्वाची धुराही राष्ट्रीय स्तरावर कुणाकडे जाईल, याचा निर्णय आपोआपच होणार आहे.

अखिलेशच्या नेतृत्वात या निवडणुका जिंकल्या आणि त्याचेच सारे समर्थक निवडून आले तर तो पक्षाचा राष्ट्रीय स्तरावरचा नेता होणार, ही भीती आहे. यादव कुटुंबाच्या बाहेरची आझम खान आणि अमरसिंह यांच्यासारखी जी मंडळी आहे त्यांना यादवी माजवून पक्षाच्या नाड्या आपल्या हातात ठेवायच्या आहेत, यासाठी त्यांनी हा कलह कालविला आहे. कुटुंबात भांडणे असली की बाहेरची मंडळी पुंडाई करू लागतात. सपाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला लालू, देवेगौडा, शरद यादव यांच्यासारखी पक्षा बाहेरची समाजवादी नेते मंडळी आली होती. लालूंनी हा समझौता घडवून आणला, असे सांगितले जात आहे. रौप्यमहोत्सवी सोहळ्यात गौरी प्रसाद प्रजापती या मागे बरखास्त करण्यात आलेल्या व पुन्हा मंत्रीमंडळात घेतलेल्या महिलने तलवार दिली. अखिलेशला आणि शिवपालना दोघांनाही दिली. त्यावर ‘ही तलवार चालविण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका’ असा टोमणा अखिलेशने मारलाच. आता या सार्‍या राजकारणाचा फायदा भाजपा कसा करून घेते, हे बघणे राजकारण पंडितांसाठी औत्सुक्याचे असेल. सपात अशी भांडणे आहेत. मायावतींचा जोर त्यामुळे वाढेल आणि दलित- मुस्लिम मते बसपाकडे वळतील, असा अनदाज आहे.

मात्र, मायावती सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही त्यांच्या कार्यकाळाबद्दल असलेली जनतेच्या मनातली चीड कायम आहे. समंजस राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा नाही. भाजपाने मुख्यमंत्री म्हणून चांगला चेहरा दिला तर फायदा होऊ शकतो. सपातली ही भांडणे मिटणे हे भाजपाच्या पथ्यावर पडू शकते, या शक्यतेतही फारसा दम नाही. सपाने राज्यात अखिलेश आणि दिल्लीत शिवपाल अशी विभागणी केली तर सध्या पुरता हा तिढा सुटू शकतो मात्र, यादवांतील भांडणे मुलायमसिंहानंतर कोण, यासाठी आहेत. यातून पार्टीची शक्ले होणारच. शिवसेनेचे काय झाले?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.