मुल्ला हसन अखुंद होणार पंतप्रधान

अफगाणिस्तानात तालिबान सरकारची घोषणा

काबूल
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारचे खाते वाटप जाहीर झाल्याचे वृत्त आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हा तालिबानी सरकारचा पंतप्रधान असणार आहे. तर, सिराज हक्कानी हा देशांतर्गत बाबींचा मंत्री असणार आहे. मुल्ला याकूब याच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी असणार आहे. मुल्ला हसन अखुंद हा तालिबानी सरकारचा पंतप्रधान असणार आहे. तर, अब्दुल गनी बरादर हा उपपंतप्रधान असणार आहे. खैरउल्लाह खैरख्वा हा माहिती प्रसारण मंत्री असणार आहे. अब्दुल हकीम याच्याकडे न्याय मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. तर, शेर अब्बास स्टैनिकझाई हा उपपराष्ट्र मंत्री असणार आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.