सोन्याच्या दरात ८० रुपयांची घसरण

मुंबई, 4 सप्टेंबर : सोने – चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात तर दरांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. मात्र आता कोरोनाच्या काळात ब-याचदा सोन्याच्या दरात घसरण होत आहे. आजही २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ८० रुपयांनी घसरून ४६,२०० रुपयांवर स्थिरावली आहे. तर चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६३६ रुपये इतका आहे. शहरांनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झालेला दिसून येतो.

जाणून घेऊया सोने-चांदीचे आजचे दर

सोन्याचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)

मुंबई – २४ कॅरेट – ४७,२०० रुपये, २२ कॅरेट – ४६,२०० रुपये

पुणे – २४ कॅरेट – ४८,६१० रुपये, २२ कॅरेट – ४५,४०० रुपये

नागपूर – २४ कॅरेट – ४७,२०० रुपये,२२ कॅरेट – ४६,२०० रुपये

नाशिक – २४ कॅरेट – ४८,६१० रुपये, २२ कॅरेट – ४५,४०० रुपये

चांदीचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक – चांदीचा दर ६३६ रुपये आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.