महाविकास आघाडीचा ट्युबलाईट उशिराच लागतो, मुनगंटीवार यांचा टोला

मुंबईः राज्यातील महाविकास आघाडीचा ट्युबलाईट उशिरा लागतो. ओबीसी आरक्षण प्रकरणात हे दिसून आले आहे, या शब्दात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने इंम्पिरिकल डेटा जमा करून तो सादर करणे अपेक्षित होते. हा डेटा गोळा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. हा डेटा म्हणजे काही जणुकाही जनगणना आहे, असा गैरसमज आघाडीतील अनेक नेत्यांचा झाला होता. कोरोनाच्या परिस्थितीत अशी जनगणना कशी करायची, असे अनेकांना वाटत होते. खरे सांगायचे तर नेत्यांसाठी देखील शिक्षणाची काहीतरी अट ठेवायला हवी, असे मुनगंटीवार म्हणाले. इंम्पिरिकल डेटा ही शास्त्रसुद्धा सांख्यिकी माहिती आहे, याकडे लक्ष वेधून मुनगंटीवार म्हणाल की, देशातील अन्य कुठल्याही राज्यांमध्ये ओबीसी आरक्षण गेले नाही. आपल्याच राज्यात ते का गेले, त्याचे कारण म्हणजे आम्ही बाजू मांडण्यास कमी पडलो. पाच सहा जिल्ह्यांमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर गेले आहे. त्यामुळे न्यायालयाने इम्पिरिकल डेटा मागविला होता. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत राज्य सरकारला राज्य कसे चालवायचे याचे मार्गदर्शन केले होते. मात्र, आघाडीच्या नेत्यांनी मोठमोठ्याने खोटे बोलणे सुरु केले. याच कारणास्तव भाजपच्या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई केली गेली. आता ओबीसी मुद्यावर बैठक झाल्यावर तीन महिन्यात डेटा मिळवता येईल, असे मंत्रीच सांगत आहे. हे कुंभकर्ण आहेत, असेही मुनगंटीवार म्हणाले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.