नगर – जामखेडच्या डॉ.आरोळे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटची निर्मिती

अहमदनगर, 7 सप्टेंबर – नवजीवन प्रतिष्ठान या संस्थेच्या पुढाकाराने जामखेड येथील डॉ.आरोळे हॉस्पिटलला होगनास इंडिया प्रा.लि.च्या वतीने देण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्लांट चे उदघाटन व लोकार्पण होग नासचे एम.डी.सुनिल मुरलीधरन यांच्या हस्ते संपन्न झाले.

जामखेड येथील डॉ.आरोळे हॉस्पिटलच्या माध्यमातून कोविड काळात सुमारे १३,००० पेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.याकाळात हॉस्पिटलला ऑक्सिजन व इतर अत्यावश्यक गोष्टींची गरज भासत होती.डॉ.आरोळे हॉस्पिटलची ही गरज लक्षात घेऊन होगनास इंडियाने सामाजिक बांधिलकी जपत ऑक्सिजन निर्मिती प्लांट देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिला.यावेळी डॉ.रवि आरोळे यांनी कोविड काळात रुग्णां ना मोफत उपचार तसेच रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलतर्फे मोफत जेवण देत असल्याचे सांगितले.येणाऱ्या संभाव्य लाटेविषयी सर्वांनी जागरूक राहावे असे त्यांनी यावेळी संगीतले.होगनासच्या मान्यवरांनी हॉस्पिटल च्या या सेवाभावी कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.होगनास इंडियाने कोरोना काळात नव जीवनच्या समन्वयाने चिचोंडी पाटील येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,निंबळक येथील अनामप्रेम संस्था,एमआयडीसी येथील कामगार कोविड सेंटर यांना बेड व गाद्या,बुऱ्हानगर प्राथमिक आरोग्य केंद्रास कोविड संरक्षणात्मक साहित्याची देणगी दिलेली आहे. तसेच १८ लाख रुपयांचे तीन व्हेंटीलेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.