नागपूर 63 मृत्यु, तर नवे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7201

Share This News

भंडारा  जिल्ह्यात आज 726 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18020 झाली असून आज 1446 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28251 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.79 टक्के आहे.आज 8469 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 1446 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 2 लाख 48 हजार 936 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 28251 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 527, मोहाडी 114, तुमसर 147, पवनी 208, लाखनी 196, साकोली 184 व लाखांदुर तालुक्यातील 70 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 18020 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 28251 झाली असून 9811 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 15 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 420 झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.79 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.49 टक्के एवढा आहे.

सहा मृत्यूसह आज 296 नवीन कोरोना बाधित तर 102 कोरोनामुक्त

गडचिरोली,दि.11: आज जिल्हयात 296 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 102 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 12396 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10687 वर पोहचली. तसेच सद्या 1576 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 133 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज सहा नवीन मृत्यूमध्ये आरमोरी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये ता.ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील तीन पुरुषाचा समावेश असून एकाचे वय 62 वर्ष, दुसऱ्या व्यक्तिचे वय 37 वर्ष व तिसऱ्या व्यक्तिचे वय 54 वर्ष होते. व चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर येथील 54 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच गडचिरोली तालुक्यातील मानसिक आजाराने ग्रस्त 6 वर्षीय बालकाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.21 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 12.71 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.
नवीन 296 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 114, अहेरी तालुक्यातील 41, आरमोरी 19, भामरागड तालुक्यातील 12, चामोर्शी तालुक्यातील 18, धानोरा तालुक्यातील 15, एटापल्ली तालुक्यातील 6, कोरची तालुक्यातील 28, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 15, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 18 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 102 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 54, अहेरी 11, आरमोरी 11, भामरागड 7, चामोर्शी 6, धानोरा 4, मुलचेरा 2, कुरखेडा 2, तसेच वडसा 5 येथील जणाचा समावेश आहे.
काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील – जिल्हयातील शासकीय 68 व खाजगी 2 अशा मिळून 70 बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोज 2010 व दुसरा डोज 185 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 46992 तर दुसरा डोज 11103 नागरिकांना देण्यात आला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.