शेतकऱ्यांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला नागपूरातही समर्थन

कृषी कायद्यांच्या विरोधात आज शेतकऱ्यांनी देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला नागपूरातूनही प्रतिसाद मिळाला. नागपूरच्या इंदोरा चौक येथे शेतकऱ्यांच्या समर्थनात आंदोलन करण्यात आले. नागपूर ट्रकर्स युनिटी या संस्थेमार्फ़त इंदोरा चौकात हे प्रदर्शन करण्यात आले.  शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. चक्काजाम आंदोलन असल्याने यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.