नागपूर जेलमध्ये असलेला डॉन अरूण गवळी आता ‘डॅडी’ नाही तर ‘आजोबा’

नागपूर/मुंबई : नागपूर मधावर्ती कारागृहात असलेला डॉन अरुण गवळी आता नुसता डॅडी राहिलेला नाही. तो आजोबा झाला आहे. गवळीच्या मुलीने एका गोंडस बाळास जन्म दिला आहे.
अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्या घरी गोंडस मुलीचं आगमन झालं आहे. गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील नर्सिंगहोम मध्ये झाला आहे. योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांची मुलगी आहे. अक्षयने इन्स्टावर मुलगी झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील नर्सिंगहोम मध्ये झाला आहे. मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकत नाही. बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघेही सुखरूप आहे, असं अक्षयने सांगितलं.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.