तबलिगींवरील दाखल गुन्हे रद्द करा, हायकोर्टाचे निर्देश

Share This News

नागपूर : संचारबंदी असतानाही मशिदीत राहिल्याने बुलडाणा पोलिसांनी तबलिगी जमातच्या १२ जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. शेख रोशन (वय ७८), अब्दूल फरीद (वय ४१), मोहम्मद खुर्शीद (वय ८१) यांच्यासह १२ जणांवर बुलडाणा येथे एपिडेमिक अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गेल्या वर्षी संचारबंदी दरम्यान ही घटना घडली. वरील सर्वजण कामठी येथील रहिवाशी असून पोलिसांनुसार बुलडाणा येथील तबलिगी जमातचे सदस्य होते. संचारबंदी असूनसुद्धा ते स्थानिक मशिदीत लपले होते. तहसीलद्वारे करण्यात आलेल्या छापामार कारवाईत त्यांना पकडण्यात आले. काही धार्मिक कारणांमुळे ते तेथे थांबल्याचे लक्षात आले. त्यांची करोना चाचणीसुद्धा पॉझिटीव्ह आली होती. मात्र, ही माहिती प्रशासनापासून लपविण्यात आल्याने त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आरोपपत्रसुद्धा दाखल करण्यात आले. आरोपींनी त्यांचे वकील मीर नगमान अली यांच्यामार्फत या आरोपपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले. हे सर्व आरोपी करोना पॉझिटिव्ह होते, याचा पुरावा सादर करण्यात पोलिसांना अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने हे गुन्हे रद्द करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त सरकारी वकील एम. देशमुख यांनी याप्रकरणी सरकारी पक्षाची बाजू मांडली.
नागपुरातही आता ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ होणार


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.