नागपूर : २४ तासांत २८८ नवीन रुग्णांची भर

Share This News

करोनाचे पुन्हा १८ बळी

नागपूर : जिल्ह्यात दिवसभरात १८ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुन्हा आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. दगावलेल्या रुग्णांत ९ रुग्ण नागपूर जिल्ह्यातील असून इतर जिल्ह्याबाहेरचे  आहेत. याशिवाय २४ तासांत शहरात २८८ नवीन रुग्णांची भर पडली.

दगावलेल्या रुग्णांत शहरातील ६, ग्रामीणचे ३, जिल्ह्याबाहेरील ९ अशा एकूण १८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ५३४, ग्रामीण ६३०, जिल्ह्याबाहेरील ५०८ अशी एकूण ३ हजार ६७२ वर पोहचली आहे.  दिवसभरात शहरात २२०, ग्रामीणला ५९, जिल्ह्याबाहेरील ९ असे एकूण २८८ नवीन बाधित आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ८८ हजार ३२९, ग्रामीण २२ हजार ७४६, जिल्हाबाहेरील ६९० अशी एकूण १ लाख ११ हजार ७६५ वर पोहचली आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात नवीन बाधितांहून २९५ करोनामुक्त  नोंदवले गेले. त्यात शहरातील २७५, ग्रामीणचे २० व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील करोनामुक्तांची संख्या ८१ हजार ५१८, ग्रामीण २१ हजार ६४९ अशी एकूण १ लाख ३ हजार १६७ वर पोहचली आहे.

नागपूर विमानतळावर अहमदाबादहून एक तर दिल्लीहून आलेल्या  ३ विमानातील ५२ व्यक्तींची सोमवारी करोना चाचणी केली गेली. त्यातील दिल्लीहून आलेला एक आणि अहमदाबादहून आलेला एक अशा दोघांना करोना असल्याचे निदान झाले. दोघेही प्रवासी मूळ नागपूरचे असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत

शहरात सोमवारी ४ हजार २७७ तर ग्रामीणला ६४९ असे एकूण ४ हजार ९२६  उपचाराधीन करोनाबाधित असल्याचे पुढे आले. त्यातील १ हजार २६ रुग्णांवर विविध रुग्णालयांत  तर ३ हजार ६१२ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.