दिवसभरात ३९४ पॉझिटिव्ह, ६ जणांचा मृत्यू

Share This News

कोरोनाबाधितांसाठी शहरात कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले होते. सद्यस्थितीत शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये १,४६0 खाटा आहे. यात केवळ ९८ रुग्ण आहेत. गांधीबाग येथील एकमात्र हॉटेलमध्ये २३ खाटा कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. परंतु एकही रुग्ण नाही. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता मनपा प्रशासन कोविड केअर सेंटर बंद करण्याच्या भूमिकेत नाही. सध्या व्हीएनआयटी व पाचपावली सेंटर सुरू आहे. पाचपावली सेंटरमध्ये ९८ बाधित व संशयित रुग्ण दाखल आहेत.लोकशाही वार्ता/नागपूर
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील चढउतार कामय आहे. मात्र, दररोज आढळून येणारी बाधितांची संख्या ३00 ते ५00 यादरम्यान आहे. मंगळवार, ८ डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात ३९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ६ जणांचा मृत्यू झाला. यातील केवळ एक जण शहरातील असून ३ जण ग्रामीण भागातील व २ जण नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत.
मंगळवारी नागपूर जिल्ह्यात ५ हजार ३४७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात ४ हजार ५४ आरटीपीसीआर व १ हजार २९३ रॅपिड अँन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. यातले ३९४ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले. या ३९४ जणांसह आता नागपूर जिल्ह्यात नोंद झालेल्या बाधितांची संख्या १ लाख १५ हजार ३२५ इतकी झाली आहे. यातील ९१ हजार २५४ जण शहरातील व २३ हजार ३५७ जण ग्रामीणमधील आहेत. तर ७१४ जण नागपूर जिल्ह्याबाहेरील आहे. मंगळवारी ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यातील १ जण शहरातील, ३ जण ग्रामीण भागातील व २ जण नागपूर जिल्ह्याच्या बाहेरील आहेत. आतापर्यंत ३ हजार ७५४ जणांचा मृत्यू झाला असून यातील ५३२ जण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. मंगळवारी ३४५ कोरोनाबाधित बरे झाले असून आतापर्यंत १ लाख ५ हजार ८६२ बाधितांनी कोरोनावर मात करून ते त्यातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ७0९ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. यातील ४ हजार २0१ कोरोनाबाधितांना कोणतीही तीव्र लक्षणे नसल्यामुळे ते घरीच उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९१. ७९ टक्के इतका झाला आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.