दिलासा! बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या वाढली

Share This News

सद्यस्थितीत शहरातील ४९५३ व ग्रामीणचे ८२९ असे ५७८२ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी जवळपास ७५ टक्क्यांवर म्हणजेच ४३५४ रुग्णांना लक्षणेच नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य व मध्यम लक्षणे असलेले केवळ २५ टक्के म्हणजेच १४२८ जण हे मेयो, मेडिकल, एम्स आदी शासकीय तसेच खासगी रुग्णालये व कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
सप्टेंबरनंतर जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या ही अधिक राहत होती. मात्र, गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोनामुक्तांची संख्या घटून बाधितांच्या संख्येत वाढ होत चालल्याचे चित्र आहे. परंतु रविवारी पुन्हा बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. रविवारी दिवसभरात नव्याने केवळ ३00 नव्या बाधितांची नोंद झाली. तर ५३४ जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मातही केली. केवळ पाचच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९२ टक्क्यांपलीकडे पोहोचले होते. मात्र, यानंतर सातत्याने होणारी रुग्णसंख्येतील वाढ यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढून कोरोनामुक्तांची संख्या घटल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही घटले आहे. रविवारी जिल्ह्यात ४८९६ चाचण्या करण्यात आल्यात. त्यामधून शहरातील २६१ व ग्रामीणचे ३९ अशा ३00 जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १७ हजार २११ वर पोहोचली आहे. रविवारी दिवसभरात ग्रामीणमधून १ तर शहरातील ४ अशा केवळ ५ बळींचीच नोंद करण्यात आली. गेल्या काही दिवसांमधील ही सर्वात कमी नोंद झाल्याचे सांगण्यात येते. यासोबतच जिल्ह्यातील एक ूण कोरोना बळींची संख्या ३७९७ वर पोहोचली आहे. तर रविवारी तब्बल ५३४ जणांना सुटी देण्यात आली. अर्थात ते कोरोनामुक्त झाले. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ७ हजार ६३२ वर पोहोचली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कालच्या तुलनेत 0.१८ टक्क्यांनी वाढून ते आता ९१.८३ टक्क्यांवर आले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.