नागपूर : ऑनलाईन सभेत होणार महापौर, उपमहापौरांची निवड

नागपूर : नववर्षात मनपाला नवे महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. ५ जानेवारी २०२१ रोजी ही निवडणूक होत आहे. आधी कविवर्य सुरेश भट सभागृहात महासभा घेण्यात येणार होती.

परंतु राज्य शासनाच्या सूचनेनुसार ही सभा ऑनलाईन घेतली जाणार आहे. परंतु यामुळे नगरसेवकांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. महापौरपदाची निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार, महापौर व उपमहापौर या पदाकरिता ज्या सदस्यांनी नामनिर्देशन अर्ज सादर केले आहे, त्यांनीच महपालिकेच्या पंजाबराव देशमुख स्मृती, स्थायी समिती सभागृह येथे उपस्थित राहाणे आवश्यक आहे. बैठकीच्या बाबतीत ४५ मिनिटापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग लिंक महापालिका सदस्य तसेच अधिकारी यांना पाठविण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.