देशात ४३,0८२ नवे कोरोनाबाधित, ४९२ मृत्यू

Share This News

नागपूर – ४५७
चंद्रपूर – १६८
गोंदिया – १३४
गडचिरोली – ६७ भंडारा – ११८
अमरावती – १0२
यवमाळ – ५२नागपुरात ४५७ पॉझिटिव्ह, आठ बळी
नागपूर : शुक्रवारला दिवसभरात जिल्ह्यात नव्याने ४५७ बाधितांची नोंद होण्यासोबतच एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख १0 हजार ७८९ वर पोहचली आहे. जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या ५२९४ व रॅपिड अँन्टिजेनच्या १६४४ अशा ६ हजार ९३८ चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी ६.५९ टक्के अहवाल सकारात्मक आलेत. दिवसभरात शहरातील ६, ग्रामीणमधील १ व इतर जिल्ह्यातील एक अशा आठ बळींची नोंद करण्यात आली. यासोबच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ३६३६ वर पोहचली आहे.वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशात सणासुदीच्या काळात बाजारात उसळलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे विविध राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात येत आहे. गेल्या एका दिवसात देशभरात ४३ हजार ८२ रुग्णांची भर पडली. तर ४९२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी दिवसभरात ३९ हजार ३७९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या त्यामुळे ९३ लाख ९ हजार ७८७ झाली आहे. यातील ८७ लाख १८ हजार ५१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ४ लाख ५५ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुर्दैवाने आतापयर्ंत १ लाख ३५ हजार ७१५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीचा दर ९३.६५ टक्के नोंदवण्यात आला. गेल्या एका दिवसात सक्रिय रूग्णसंख्येत ३ हजार २११ ने वाढ नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार गेल्या एका दिवसात सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रात ६ हजार ४0६ रूग्ण आढळले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.