नागपूर महापालिका सुरू करणार मिनरल वॉटर प्रकल्प,शंखनाद च्या विशेष मुलाखतीत महापौरांची माहिती

नागपुरकरांना येत्या काळात ५ रुपयात सीलबंद बाटलीत पाणी उपलब्ध होणार आहे, याप्रकारची योजना सुरु करणारी नागपूर महापालिका हि देशातील पहिली महापालिका ठरणार असल्याची माहिती नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.’शंखनाद’ च्या ‘विशेष मुलाखत’ कार्यक्रमात ते बोलत होते. नागपूर महानगर पालिका हि नागरिकांना सर्वात स्वस्त दरात पाणी उपलब्ध करवून देते,आता नागपूर महानगर पालिका मिनरल वॉटर च्या माध्यमातून सीलबंद बाटलीत केवळ पाच रुपयात पाणी उपलब्ध करवून देणार आहे. यासाठी तयारी जवळपास पूर्ण झाली असून भारतीय रेल्वेचे देखील यासाठी सहकार्य घेण्याची योजना असल्याचे महापौर यांनी सांगितले. यामाध्यमातून महापालिकेला ३० ते ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न होऊ शकते असे  महापौर तिवारी यांनी सांगितले. महापौर म्हणून केवळ १३ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे पण मिळालेल्या अवधीचा पूर्ण वापर करून नागपूर शहराचा विकास साधायचा असल्याचं मनोगत महापौरांनी यावेळी व्यक्त केला. महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचं मान्य करत मालमत्ता कर,पाणी कर,जाहिरातीचे फलक या माध्यमातून उत्पन्न वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळात थांबलेल्या  विकास कामांविषयी महापालिका आयुक्तांसोबत चर्चा झाली असून हि कामे ताबडतोब सुरु होणार असल्याचंही महापौर म्हणाले. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने राज्य सरकार दुजाभाव करत असेल पण यामुळे जनतेची कामे थांबतात त्यामुळे याकरिता पालकमंत्र्यांशी भेटून प्रयत्न करणार.सोबतच प्रशासनाने सहकार्याने काम करावे असे आवाहनही तिवारी यांनी केले. वेळ कमी असून आव्हाने खूप जास्त आहेत,परंतु आव्हानांना तोंड देऊन कामे करून सर्व संकटातून बाहेर पडणार असल्याचा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला. ओला व सुका कचऱ्याचं वर्गीकरण करुनच मग तो कचरा महापालिकेच्या घंटा गाडींमध्ये द्यावा व यासाठी नागरिकाचे सहकार्य अपेक्षित असल्याचं महापूर म्हणाले. संपूर्ण नागपूर शहरात लोकसहभागातून ७५ वंदे मातरम जन स्वास्थ्य केंद्र सुरु करणार असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. सोबतच यंदाच्या सत्रापासून महापालिका इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.