भारतातून दोन छायाकल्प चंद्रग्रहणांचे दर्शन

Share This News

नागपूर : २०२१ वर्षांत खगोलप्रेमींना चार ग्रहणे, ११ उल्कावर्षांव, तीन धुमके तू, युती-प्रतियुती, सुपरमून, ब्लॅक मून आणि ग्रह पाहण्याची  संधी मिळणार आहे. यात प्रामुख्याने भारतातून दोन छायाकल्प चंद्रग्रहण पाहण्याची संधी आहे. मात्र, त्याचवेळी पृथ्वीजवळून सहा धोकादायक लघुग्रह जाणार आहेत, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

या वर्षांत के वळ चार ग्रहणे होणार असून त्यात दोन चंद्रग्रहण व दोन सूर्यग्रहणांचा समावेश आहे. भारतात मात्र काही भागातून के वळ दोन छायाकल्प चंद्रग्रहणच पाहता येणार आहेत. २६ मे रोगी खग्रास चंद्रग्रहण होणार असून ते भारतात गुजरात, राजस्थान व काश्मीरवगळता उर्वरित भारतातून दिसेल. दुसरे कंकणाकृती सूर्यग्रहण १० जूनला दिसणार असून ते उत्तर धृवीय प्रदेशातून पूर्व रशिया, पश्चिम ग्रीनलँड आणि कॅ नडा येथून दिसेल. तिसरे खंडग्रास चंद्रग्रहण १९ नोव्हेंबरला पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम भारतातून ते दिसणार नाही. मात्र, विदर्भासह पूर्व भारतातून ते दिसेल. चौथे खग्रास सूर्यग्रहण ४ डिसेंबरला असून ते दक्षिण अफ्रि का आणि अंटाक्र्टिका येथून दिसेल.

‘२०१६ डीव्ही-१’ हा २०० फू ट आकाराचा लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक असून तो २ मार्च २०२१ला चंद्र आणि पृथ्वीच्या मधून किमान दीड लाख ते दहा लाख किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. हा लघुग्रह २८ फे ब्रुवारी २०१६ ला तीन लाख किलोमीटर लांबून गेला होता. त्यामुळे तो यावर्षी याहीपेक्षा जवळून जाण्याची शक्यता असून तो धोकादायक श्रेणीत येतो. त्यातील ‘अपोलो लघुग्रह २००१ एफओ ३२’ हा २१ मार्चला ०.०१३ एयू (अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनिट/खगोलीय घटक) अंतरावरून जाणार आहे. २५ मे रोजी ‘अपोलो २०१२ यूव्ही १३६’ हा लघुग्रह ०.०१० एयु अंतरावरून जाणार आहे. एक जूनला ‘अटेन २०१८ एलबी’ हा लघुग्रह ०.००७ एयू अंतरावरून जाणार असून हा सर्वात धोकादायक श्रेणीत येतो. ४ जुलैला ‘अपोलो लघुग्रह २०२० एडी-१’ ०.००७ एयु अंतरावरून जाणार असून धोकादायक श्रेणीत येतो. १३ जुलैला ‘अपोलो लघुग्रह २०१९ एटी-६’ हा ०.०११ एयू अंतरावरून जाणार आहे. १४ ऑगस्टला ‘अपोलो लघुग्रह २०१६ बीक्यू’ हा ०.०११ एयु इतक्या अंतरावरून जाईल, अशी माहिती प्रा. चोपणे यांनी दिली.

सुपरमून, ब्ल्यू मूनचाही योग

११ फे ब्रुवारीला ब्लॅक मून, १४ एप्रिल, ११ मे व आठ जूनला मायक्रोमून, २७ एप्रिलला सुपर मून, २६ मे रोजी सुपर फ्लॉवर मून, २४ जूनला सुपरमून व २२ ऑगस्टला ब्ल्यू मून दिसेल


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.