नागपूर आरपीएफ ने ३३ लाख रुपयांचे सिगारेट केले जब्त 

आरपीएफ पोलिस स्टेशन चे निरीक्षक आरएल मीना  यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रतिबंधक कर्तव्य कर्मचारी रक्षक प्रवीण चव्हाण, संरक्षक राजेश गडपालवार आणि उपनिरीक्षक एच.एम.जयस्वाल यांच्यासह प्लॅटफॉर्म क्र. ६ आणि ७ वर पेट्रोलिंग करत असतांना त्यांना इटारसी ट्रेन मध्ये अपलोड होत असलेल्या मालमध्ये सिगरेट ची गन्ध आल्याने त्यांनी ऑन ड्युटी चीफ पार्सल सुपरवायझर अतुल श्रीवास्तव यांना घटनास्थळी बोलावून संयुक्तपणे तपासणी करण्यात आली. आणि सांगितलेल्या पार्सलमध्ये पॅरिस ब्रँडची परदेशी सिगारेट दिसली.हि सिगारेट  ०२८८८ ट्रेन द्वारे  नवी दिल्ली ते विशाखापट्टणम रेल्वेमध्ये बुक केले गेले होते . त्यापैकी निम्मे पार्सल नागपूर स्थानकावर वाणिज्य विभागाने उतरवले असून उर्वरित अर्धे विशाखापट्टणम येथे पोहोचले आहेत हे प्रकरण परदेशी सिगारेटचे असल्याने केंद्रीय उत्पादन शुल्क  विभागात सुपूर्द करण्यात आले आहे , या कार्रवाहीत आरपीएफ विभागाने  किमान ३३ लाख रुपयांची सिगारेट जब्त केली . 

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.