नागपूर :शहराला होणार एक दिवसा आड पानी पुरवठा

Share This News

नागपूर शहरातील नागरिकांना आता पुढील एक महिना एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. नागपूर महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा समितीचे सभापती पिंटू झलके यांनी हि माहिती दिली. त्यामुळे 6 जानेवारी पासून पुढील एक महिना नागपूरकरांना दररोज पाणी पुरवठा होणार नाहीय. नागपूर शहराला महानगर पालिकेच्या वतीने पेंच जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. हे पाणी २७ किलोमीटर लांबीच्या पाईप लाईन द्वारे आणल्या जाते. पाणीपुरवठा सभापती पिंटू झलके यांनी या २७ किलोमीटर लांब पाईप लाईन चे निरीक्षण केल्यावर एकूण चार ठिकाणी या पाईप लाईन ला गळती असल्याचे निदर्शनात आले. पारशिवनी,ईटगाव,करमभाड क्षेत्रातीळ चार ठिकाणी हि गळती आहे.

या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यव होत आहे. पाण्याचा हि गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीच्या कामामुळे शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.