सर्वसामान्यांना झटका बसण्याची चिन्हं, पेट्रोल-डिझेलवर टॅक्स वाढवण्याच्या केंद्राच्या हालचाली

Share This News

नवी दिल्ली : कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या संसर्गामुळे संपूर्ण देशावर आर्थिक संकट ओढावलं आहे. याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर कर (Tax) वाढवण्याच्या तयारीत आहे. सरकारकडून दोन्ही इंधनावरील उत्पादन शुल्क (Excise Duty) 3 ते 6 रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकतं. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. (government soon increase excise duty on petrol diesel in india upto 6 rupees per liter)

आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या कठीण काळात आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी सरकार हा निर्णय घेणार आहे. त्यामुळे जर पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कांमध्ये वाढ झाली तर संपूर्ण आर्थिक वर्षात एकूण 60,000 कोटी रुपये मिळू शकतात. चालू आर्थिक वर्षामध्ये मार्चपर्यंत सरकार त्यातून 30,000 कोटी रुपये जमा करू शकतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क ठरवण्यासाठी सरकारी पातळीवर बैठकांवर बैठका सुरू आहेत. त्यामुळे यासंबंधी लवकरच मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. खरंतर, उत्पादन शुल्क वाढवताना याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर होणार नाही याचाही सरकार विचार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण जर असं झालं तर देशात महागाई वाढू शकते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घसरण झाल्याचं दिसून येतं. गेल्या एका महिन्यापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. (government soon increase excise duty on petrol diesel in india upto 6 rupees per liter)

सध्या जागतिक बाजारात कच्चा तेलाची किंमत 40 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. तर एक महिन्याआधी ही किंमत 45 डॉलर प्रति बॅरल होती. याच वर्षी मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारने संसदेत पेट्रोलवर पेट्रोलवर 18 रुपये आणि डिझेलवर 12 रुपये उत्पादन शुल्क वाढवण्याचा अधिकार घेतला होता. यानंतर सरकारने मे महिन्यात पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 12 रुपयांची वाढ केली तर डिझेलमध्ये 9 रुपयांची वाढ केली. यानंतर आता सरकार पुन्हा एकदा पेट्रोलवरील उत्पादन शुल्क वाढवून 6 रुपये आणि डिझेलमध्ये 3 रुपयांची वाढ करण्याचा विचार करत आहे.

सरकारने जर आताच कर वाढवला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्ये कोणताही फरक होणार नाही. पण कर वाढवल्याने पेट्रोल आणि डिझेल कर आकारणाऱ्या देशांमध्ये भारत आणखी पुढे जाईल. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलवर 70 टक्के कर आकारला जातो. जर ते पुन्हा वाढले तर दर 75 ते 80 टक्के होण्याची शक्यता आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.