अर्णव गोस्वामीविरोधात राष्ट्रवादीचे जोरदार आंदोलन | NCP’s strong agitation against Arnab Goswami

Share This News

मुंबई – गली गली मे शोर है अर्णव गोस्वामी चोर है… अटक करा अटक करा अर्णव गोस्वामी याला अटक करा… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने अर्णव गोस्वामी याच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
 देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढणार्‍या अर्णव गोस्वामी याच्याविरोधात देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही अर्णव गोस्वामी याला अटक करण्यासाठी आणि देशाची गोपनीय माहिती देणार्‍या व्यक्तीचे नांव जाहीर करावे यासाठी आज त्याच्या रिपब्लिक टिव्हीच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. दरम्यान अर्णव गोस्वामी याला गोपनीय माहिती मिळाली आणि त्याने चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी उपयोग केला ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी व गृहमंत्री अमित शहा यांनी यावर खुलासा करावा अशी मागणी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी केली तर राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी अर्णव गोस्वामी याला ही गोपनीय माहिती कुणी पुरवली याची माहिती उघड करावी अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली.
 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अर्णव गोस्वामीविरोधात राष्ट्रवादीचे जोरदार आंदोलन | NCP’s strong agitation against Arnab Goswami


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.