नवं वर्ष, नवी भूमिका; आजपासून संयुक्त राष्ट्र संरक्षण परिषदेचा सदस्य असणार भारत Ninth year, new role; India will be a member of the United Nations Security Council from today

आजपासून नववर्षाला सुरूवात झाली आहे आणि हे नववर्ष भारतासाठीही अनेक बाबतींत महत्त्वाचं असणार आहे. आज म्हणजेच १ जानेवारीपासून भारत संयुक्त राष्ट्र संरक्षण परिषदेच्या अस्थायी सदस्याच्या रुपात सहभागी होणार आहे. १ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या कार्यकाळात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठीही सज्ज आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत यांनी या कार्यकाळात भारताची भूमिका काय असेल याबाबत माहिती दिली. भारत मानवाधिका आणि विकासासारख्या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यूएनएससीमध्ये पाच स्थायी सदस्य आणि १० अस्थायी सदस्य असतात. आठव्यांदा भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. “जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत हा मानवाधिकार आणि विकासासारख्या मुद्द्यांवर या परिषदेत भर देणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अनेक मार्गांनी प्रतिबिंबित झालेल्या एकीकृत चौकटीत आपण विविधता कशी वाढवू शकतो, असा संदेशही भारत देणार आहे,” अशी माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्ती म्हणाले.  “या बैठकीत भारत व्यापक सहकार्याची गरजही पटवून देणार आहे. आम्ही यापूर्वी मिळत होतं त्यापेक्षा अधिक सहकार्याची अपेक्षा करत आहोत. ज्यामध्ये कोणत्याही समस्यांचं निराकरण केलं जाऊ शकेल आणि विकासाचा मार्गही मोठा असेल,” असं त्रिमूर्ती म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.