ऑनलाईन क्लासेस मुलांच्या डोळ्यांसाठी घातक

कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्यामुळे मुले मोबाईल, लॅपटॉपवर ऑनलाईन क्लासेस करीत आहेत. सततचे टीव्ही बघणे, मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर राहिल्यामुळे मुलांमध्ये डोळे दुखणे, डोके दुखण्याचे प्रमाण वाढत आहे. लहान वयातच मुलांना मायग्रेनसारखी समस्या उद्भवत असून, हे त्यांच्या डोळ्यांसाठी घातक आहे, असे मत डॉ. विवेक लाल यांनी व्यक्त केले.
इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीतर्फे आयोजित राष्ट्रीय मेंदू सप्ताहाच्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. या चर्चासत्रात नवी दिल्लीचे डॉ. सुमीत सिंग, मुंबईचे डॉ. जॉस देसाई, कोझीकोडाचे डॉ. प्रदीप कुमार, आग्र्याचे डॉ. पी. के. माहेश्‍वरी आणि रायपूरचे डॉ. संजय शर्मा होते. सोबतच, आयएएनचे अध्यक्ष डॉ. जे. एम. के. मूर्ती, डॉ. निर्मल सूर्या यांचीही उपस्थिती होती. ‘लॉस ऑफ व्हिजन’ वर बोलताना डॉ. लाल म्हणाले की, मायग्रेनमुळे डोळ्याची दृष्टी जाण्याचे प्रमाण वाढते आहे. पालकांनी मुलांच्या डोळ्यांची काळजी घ्यावी. त्यांचा स्क्रीनिंग टाईम कमी करावा, योग्य आहार, नियमित व्यायामाची मुलांना सवय लावावी.
डॉ. सुमीत सिंग यांनी ‘मल्टिपल स्केलेरॉसिस’ वर आपले मत मांडले. यावेळी त्यांनी सांगितले की, मल्टिपल स्केलेरॉसिस म्हणजे काय, त्याचे प्रकार, कारणे, उपाय आणि व्याप्ती सांगितली. ते म्हणाले, थकवा येणे, दृष्टी दोष, मुंग्या येणे, उंच ठिकाणाची भीती वाटणे, चक्कर येणे, तोल जाणे, अस्पष्ट उच्चार, मलमूत्रविसर्जनाच्या समस्या अशी अनेक लक्षण या आजाराचे असून, या विकाराला रोखता येत नाही. वेळीच निदान केले तर त्याची तीव्रता कमी करू शकते. जीवनशैलीच अचूक बदल, समतोल आहार आणि मद्यपान,तंबाखू आदी व्यसनांपासून दूर राहिल्याने या आजाराचा प्रतिबंध करता येतो, असे ते म्हणाले. राष्ट्रीय मेंदू सप्ताहाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. चंद्रशेखर मेर्शाम यांनी प्रास्ताविक करून आभार व्यक्त केले.
प्रतिकारशक्ती वाढीसाठी चांगली झोप आवश्यक
डॉ. जॉय देसाई झोप न येणे या समस्येवर मार्गदर्शन केले. झोप कशी येते, झोप येणे म्हणजे काय, मेंदू कसा व का झोपतो, झोपेची का आवश्यकता असते, झोपेचे विविध प्रकार आदींबाबत त्यांनी माहिती दिली. मेंदू जेव्हा झोपतो तेव्हा मेंदूतील प्रेाटीनची सफाई करण्याचे काम सुरू होते. प्रतिकार क्षमता वाढवायचे असेल तर चांगली झोप आवश्यक आहे. झोप ही स्मृती आणि शिकविण्यासाठी असते, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.