नागपूरचा नवा महापौर, उपमहापौर कोण? निवडणूक ऑनलाईन होणार!

Share This News

नागपूर : महानगर पालिकेत भाजपचं वर्चस्व असल्यानं महापौर आणि उपमहापौर (Mayor and deputy Mayor) हा भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे. पण आज महापौर, उपमहापौरांची निवड ऑनलाईन पद्धतीनं (Online election process) होणार असल्यानं सत्ताधाऱ्याचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी 11 वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्या माध्यमातून ही निवडणूक घेतली जाणार आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर विद्यमान महापौर संदीप जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला. तसंच उपमहापौर मनिषा कोठे यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी महापौर आणि उपमहापौरांची निवड आज करण्यात येणार आहे. भाजपकडून महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी यांनी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौरपदासाठी मनिषा धावडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.