Share This News

केवळ दोन हजार डोस शिल्लक
केंद्र शासनाकडून होणारा लसींचा तुटवडा अद्यापही कायम असल्यामुळे राज्यासह नागपूर शहराचे लसीकरणदेखील रखडले आहे. परिस्थिती अशीही आहे की शहरात केवळ दोन हजारच डोज शिल्लक आहे. अशात महापालिके ने ‘लसीकरण आपल्या परिसरात’ या मोहिमेची घोषणा केली. एकीकडे लसच नसल्यामुळे १८ ते ४४ वर्षांवरील लसीकरण थांबविण्यात आले आहे. केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात असून, यातही कोव्हॅक्सिनचा केवळ दुसराच डोज दिला जात आहे.
१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर शहरात केवळ ११ हजार १४१ नागरिकांना लस देण्यात आली. परंतु, लसींचा पुरवठाच प्रभावित झाल्यामुळे हे लसीकरण बंद करण्यात आले आहे. फ्रंटलाईन वर्कर्सना लस देणे बंद करण्यात आले आहे. अर्थात लसीकरणाच्या नावाखाली शहरात एक प्रकारे नागरिकांची थट्टा करण्याचा प्रकार सुरू आहे. शहरात एकूण २0७ केंद्र आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.