ग्राम स्‍वराजवर शनिवारपासून ‘वर्धा मंथन’ चे आयोजन

वर्धा, 03 फेब्रुवारी : वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी अकादमी भवनाच्या कस्तुरबा सभागृहात शनिवार आणि रविवारी (6 आणि 7 फेब्रुवारी रोजी) ‘वर्धा मंथन-2021’ या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कार्यशाळेचा शुभारंभ होणार असून समापन समारंभाला माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होतील.  
कुलगुरु डॉ. रजनीश कुमार शुक्ल म्‍हणाले की, कार्यशाळेचे उद्घाटन 06 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वा. होईल. यावेळी केंद्रीय रस्‍ते वाहतूक आणि सूक्ष्‍म, लघु व मध्‍यम उद्यम मंत्री नितीन गडकरी, महात्‍मा गांधी केंद्रीय विश्‍वविद्यालय, मोतिहारी (बिहार)चे कुलाधिपती तथा खादी व ग्रामोद्योग आयोगाचे माजी अध्‍यक्ष, डॉ. महेश शर्मा, वर्धेचे खासदार रामदास तडस तथा विनोबाजींचे सचिव बालविजय सहभागी होतील. या उद्घाटन सत्रानंतर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 2 वाजेदरम्‍यान ‘ग्राम विकासाचे देशज प्रयोग’ या विषयावर, दूसरे सत्र साडे तीन पासून पाच वाजेपर्यंत ‘शेती’ विषयावर, तीसरे सत्र सायंकाळी साडे पाच पासून साडे सहा पर्यंत ‘कारागिरी’ या विषयावर आयोजित करण्‍यात येईल. कार्यशाळेच्‍या दुस-या दिवशी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत ‘स्वच्छता व आरोग्‍य’ यावर, पाचवे सत्र दुपारी 12 ते 1.30 वाजे दरम्‍यान ‘धर्मपाल यांची भारतीय दृष्टी’ या विषयावर तर सहावे सत्र दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत ‘विश्‍वविद्यालयांमध्‍ये गांधी अध्ययनाची दिशा’ यावर आयोजित करण्‍यात येईल. 

 त्याचप्रमाणे विविध तांत्रिक सत्रांमध्‍ये देशभरातील प्रतिष्ठित कार्यकर्ते आणि प्रतिनिधी ऑफलाइन व ऑनलाइन माध्‍यमातून विचारमंथन करतील. यावेळी कार्यशाळेत देवाजी तोफा (मेंढा लेखा, गडचिरोली), सुनील देशपांडे (मेळघाट, अमरावती), मोहन हीराबाई (मेंढा लेखा), डॉ. सुधीर लाल (इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली), बसंत सिंह (नवी दिल्‍ली), पोपटराव पवार (हिवरे बाजार), रवि गावंडे (यवतमाळ), लोकेंद्र भाई (खादी बिरादरी, पुणे), दिलीप केळकर (मुंबई), आशीष गुप्ता (जबलपूर), रूपेश पाण्डेय (वाराणसी), डॉ. आर. के. पालीवाल, राकेश दुबे, डॉ. हबीब, विवेक कटारे (भोपाळ), संजय सराफ़, अनिल सांबरे, विशाखा राव, सचिन देशपांडे, श्रीप्रकाश पाठ्या, (नागपुर), प्रो. अर्चना सुरेश स्याल (हरिद्वार), उल्हास जाजू (वर्धा) तर ऑनलाइन माध्‍यमातून कार्यशाळेत सहभागी होतील – पद्मश्री अशोक भगत (झारखंड), अजीत महापात्र (अखिल भारतीय गोसेवा प्रमुख), अभय महाजन (दीनदयाल शोध संस्थान, चित्रकूट), डॉ. गीता धर्मपाल, श्री पवन गुप्ता (मसूरी), इंदुमती काटदरे (अहमदाबाद) आणि राजकुमार भाटिया (दिल्ली) प्रत्यक्ष सहभाग नोंदवतील.
प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी सांगितले की दोन दिवसाच्‍या कार्यशाळेचा समारोप रविवार, 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.15 वा. होईल. यावेळी मुख्‍य अतिथी म्‍हणून शिक्षण तज्‍ज्ञ आणि माजी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री  मुरली मनोहर जोशी ऑनलाइन उपस्थित राहतील. विशेष उपस्थिती इंदिरा गांधी राष्‍ट्रीय कला केंद्र, नवी दिल्‍लीचे सदस्‍य सचिव प्रो. सच्चिदानंद जोशी यांची राहील. समापन सत्राच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल राहतील. विद्यापीठाने वर्धेतील 10 गावे दत्‍तक घेतली आहेत. अशा गावांमध्‍ये विद्यार्थी आणि शिक्षक ग्रामीण नागरिकांसोबत त्‍यांच्‍या समस्यांवर चर्चा करुन उपाय करण्‍याचे मार्ग सूचवितात. या दोन दिवसीय कार्यशाळेची समस्‍त कार्यवाही ई-पुस्‍तक रूपाने ‘वर्धा संकल्‍प’ शीर्षकाने समारोप सत्रात जारी करण्‍यात येईल असे कुलगुरू शुक्ल यांनी स्पष्ट केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.