नागपुरात महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यू अधिक.

गेल्यावर्षीच्या तुलनेत करोना काळात मृत्यूचा टक्का वाढला.percentage-of-deaths-during-the-corona-period-increased-compared-to-last-year

नागपूर : विदर्भातील करोनाचे सर्वाधिक मृत्यू नागपुरात नोंदवले गेले आहेत. त्यातच गेल्यावर्षीच्या तुलनेत नागपूर शहरात करोनासह सर्वच आजारांच्या एकंदरीत मृत्यूंमध्ये एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या वर्षीहून एप्रिल ते सप्टेंबर २०२० यावर्षी मृत्यूंचे प्रमाण ७.१० टक्क्यांनी वाढले आहेत.  नागपूर महापालिकेची सलग दोन वर्षांतील मृत्यूची आकडेवारी बघता महिलांहून पुरुषांचे मृत्यू अधिक असल्याचे पुढे आले आहे.

नागपूर महापालिका हद्दीत एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या सहा महिन्यांत  ८ हजार ४८० पुरुष  आणि ५ हजार ३३४ महिला असे एकूण १३ हजार ८१४ मृत्यू नोंदवले गेले. २०२० मध्ये याच कालावधीत ८ हजार ९९९ पुरुष  आणि ५ हजार ७९७ महिला असे एकूण १४ हजार ७९६ मृत्यू नोंदवले गेले. २०१९ या वर्षीच्या तुलनेत २०२० मध्ये मृत्यूचे प्रमाण ७.१० टक्यांनी वाढले आहे.  एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांच्या कालावधीत नागपुरात १३ हजार १६१ पुरुष  आणि ८ हजार २५७ महिला असे एकूण २१ हजार ४१८ मृत्यू नोंदवले गेले.

२०२० मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात येथे १३ हजार १९३ पुरुष  आणि ८ हजार ६४५ असे एकूण २१ हजार ८३८ मृत्यू नोंदवले गेले आहेत.  २२ मार्च २०२० ते १५ सप्टेंबर २०२० या कालावधीत शहरातील विविध स्मशान घाटांवर करोनाने दगावलेल्या १ हजार ७३७ पुरुष  आणि १ हजार ३ महिला असे एकूण २ हजार ७४० रुग्णांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वाधिक २ हजार ६१८ मृतदेहांवरील अंत्यसंस्कार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील आहेत.

ल्यावर्षीहून २०.७३ टक्के जन्मदर कमी

नागपूर महापालिका हद्दीत एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या सहा महिन्यांत १३ हजार ३६२ मुले आणि १२ हजार ६०३ मुली असे एकूण २५ हजार ९६५ बालके जन्मली. २०२० मध्ये याच कालावधीत १० हजार ७१९ मुले  आणि ९ हजार ८६३ मुली  असे एकूण २० हजार ५८२ बालकांचा जन्म झाला. गेल्यावर्षीहून २०२० मध्ये जन्माचे प्रमाण २०.७३ टक्के कमी आहे.  एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत येथे २० हजार ९४० पुरुष मुले, १९ हजार ७३२ मुली असे एकूण ४० हजार ६७२ बालकांचे जन्म झाले.  जानेवारी ते सप्टेंबर २०२० या नऊ महिन्यांत येथे १६ हजार ६८० मुले  आणि १५ हजार ५५६ मुली असे एकूण ३२ हजार २३६ बालकांचे जन्म नोंदवले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.