चांदूरबाजार तालुक्यात पीएम किसान योजनेचे ५६७ आयकर भरणारे अपात्र

Share This News

चंद्रपूर :आयकर भरणारे इतर नोकरदार व मासिक १0 हजारांचे वर पेन्शन धारक असलेल्यांचा समावेश आहे. तालुक्यात तपासणी अंती आयकरभरणारे पीएम किसान साठी अपात्र ठरलेल्या ५६७ लाभार्थ्यां कडून, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या पत्रानुसार अंदाजे ४ कोटी ८६ लाख रूपयांची वसूली करण्यात येणार आहे.ही वसूली नगदी किंवा चेक धनादेशाद्वारे केलेल्या जाणार आहे.तसेच वसुली न देणार्‍यावर पोलीस कारवाई करुन ,ही रक्कम अपात्र लाभार्थ्यां कडून वसूल करण्यात येणार आहे.
आज पयर्ंत तालुक्यात पीएम किसान साठी, ३१हजार, ३७८ शेतकरी लाभार्थ्यांची नोंद झाली आहे.यात तहसिल तपासणीत २६ हजार,११0 शेतकरी लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.या शेतकर्‍यांना केंद्र सरकार कडून वषार्काठी,सहा हजार रुपए सन्मान निधी दिल्या जातो.तहसिल कार्यालयाच्या तपासणी अंतर्गत योजनेतील पात्र लाभार्थ्यां मधिल,आयकर भरणारे वगळता इतर दोन हजार ५२0 लाभार्थी ही अपात्र ठरण्याची शक्यता आहे.त्यामुळे तालुक्यात या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या, तसेच वसूलीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरवातीला केंद्राची ही योजना, फक्त अत्यल्प व अल्प भूधारक शेतकर्‍यांसाठीच होती.मात्र देशातील २0१९ च्या सार्वत्रिक निवडणूक नंतर,यात काही निकषावर सर्वच शेतकर्यांचा समावेश करण्यात आला.परंतू बर्याच शेतकर्‍यांनी निकष डावलून, परस्पर ऑनलाईन अर्ज भरले.त्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला असल्याचे दिसून येते.तालुक्यात आयकर भरणारे वगळता, एक किंवा दोन तालुक्या वेगवेगळ्या ठिकाणी शेती असणार्यांनी दोन ठिकाणी योजनेचा लाभ घेतला आहे.असे लाभार्थीही अपात्र ठरू शकतात.तसेच पती-पत्नी पैकी एकालाच योजनेचा लाभ घेता येतो.परंतू काही ठिकाणी दोघेही लाभ घेत आहेत.यापैकी एकाला अपात्र ठरविल्या जाऊ शकत.त्याच प्रमाणे १८ वर्षा आतील शेतकरी मुलगा व २४ वर्षा पयर्ंतचा लग्न झालेला मुलगा,हे वडीलांच्या कुटुंबाचाच भाग समजल्या जातो.योजनेच्या निकषा नुसार असे लाभार्थी अपात्र ठरतात.परिणामी भविष्यात अशा लाभार्थ्यांना,अपात्र ठरवून त्यांच्या कडूनही घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल केल्या जाऊ शकते.

पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यां कडून, घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.वरिष्ठांच्या आदेशानुसार वसूलीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.जे लाभार्थी सदर रक्कम शासनास परत करणार नाहीत,त्यांचेवर नियमानुसार पोलीस कारवाई करून वसूली करण्यात येईल.या बाबतचे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत.
धिरज स्थुल, तहसिदार, चांदूरबाजार


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.