जेएनयूतील कार्यक्रमासाठी उत्सुक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली,  12 नोव्हेंबर  

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार  संध्याकाळी 6.30 वाजता  दृक-श्राव्य माध्यमाद्वारे  जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील स्वामी विवेकानंदांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोख्रीयाल निशंक, जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचे कुलुगुरू मामिडला जगदीश कुमार आणि अन्य मान्यवरसुद्धा या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहतील. या कार्यक्रमासंदर्भात ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “संध्याकाळी 6.30 वाजता  मी जवाहरलाल नेहरू विद्यापिठ परिसरात स्वामी विवेकानंदांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करील तसेच आपले विचार वक्त करील. दृक-श्राव्य माध्यमाद्वारे होणा-या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मी उत्सुक आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.