नागनदीचा होणार कायापालट

शहरातील नागनदीचा लवकरच कायापालट होणार असून नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी कर्ज देणार्‍या जपानच्या जायका कंपनीने प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर त्या अनुषंगाने प्रकल्पांतर्गत शासनाकडून क्लियरंस घेऊन एनआरसीडी  मार्फत पीएमसी  नियुक्त होणार आहे. पीएमसी आयआयटी रुरकी यांनी तयार केलेल्या पोस्ट प्रोजेक्टची तपासणी करेल. पीएमसी लवकरात लवकर नियुक्त करा, असे निर्देश केंद्रीय जलसंसाधन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिले. प्रकल्पासंदर्भात बुधवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी गडकरी यांनी नीरीचे डॉ. सतीश वटे यांना पीएमसीमध्ये समाविष्ट करण्याचे सुचविले, बैठकीत नागपूर महापालिकेच्या वतीने महापौर दयाशंकर तिवारी तसेच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. उपस्थित होते. प्रकल्पाकरिता जपानच्या जायका कंपनीमार्फत कर्ज उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला जायकाने मंजुरी दिली आहे. परंतु, केंद्राकडून मंजुरी बाकी आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १ हजार २५२ कोटींच्या निधीतून उत्तर व मध्य सिव्हेज झोनमध्ये निर्मित संपूर्ण सिव्हेजचे संकलन व नि:सारणाकरिता व्यवस्थापन. मलनि:सारण केंद्र उभारले जाईल. पंपिंग स्टेशन उभारणे. प्रक्रिया केलेले सांडपाणी पुन्हा नदीत सोडणे. नदीला मलमुक्त वाहती नदी केली जाईल. दुसर्‍या टप्प्यात नदीपात्रातील परिसराचे सौंदर्यीकरण, नदीलगत वसलेल्या वस्त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.