कामठी रोडवरील कॅसिनो बारमध्ये 23 मुले आणि 6 मुली पकडल्या गेलेल्या पोलिसांनी छापा टाकला

डीसीपी निलोटपाल यांची कार्यवाही

नागपूर
पोलिसांनी केलेल्या छापा कारवाईत शनिवारी रात्री कपिलनगर हद्दीतील कॅसिनो बार आणि रेस्ट्रो लाउंज येथून २३ मुले आणि ६ मुलींना ताब्यात घेण्यात आले. या छाप्यात विदेशी दारू, हुक्का जप्त करण्यात आला. हे तरुण-तरुणी धुंदीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजाच्या गाण्यांवर नाचत असताना आढळून आले.
कॅसिनो बार आणि रेस्ट्रो लाउंजमध्ये अवैध हुक्का पार्लर चालत असल्याची माहिती डीसीपी निलोत्पल यांना मिळाली. त्यांनी जरीपटकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांना धाड घालण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचार्‍यांना वरिष्ठ अधिकार्‍यांनी तेथे पाठविले.

तेथे सर्वत्र मद्यपान आणि तंबाखूपासून बनविलेल्या हुक्क्याचे सेवन करताना अनेक युवक-युवती आढळून आले. पोलिसांनी संपूर्ण बारची तपासणी करून तेथूनच २३ मुले आणि ६ मुलींना ताब्यात घेतले. तसेच त्या बारचे मालक मोहित गुप्ता आणि साहिल गुप्ता, डीजे आणि हुक्का सर्व्ह करणार्‍या कर्मचार्‍यालाही ताब्यात घेण्यात आले. छापा कारवाईत १५ हजार रु. किमतीची विदेशी दारू आणि बिअर, ४९ हजार रुपयांची हुक्क्याची भांडी, डीजे मिक्सर आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली.
याप्रकरणी कॅसिनो बारच्या मालक मोहित गुप्ता आणि साहिल गुप्ता यांच्याविरुद्ध कपिलनगर पोलिस ठाण्यात कलम ६५ ई, ६८, ८३, दारूबंदी कायदा, कलम ४ ए आणि २३ ए अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई परिमंडळ क्र.५ चे पोलिस उपायुक्त निलोत्पल पाठक यांच्या मार्गदर्शनात जरीपटका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगळे, सहा. पो. निरीक्षक बजबलकर, सहा.पोलिस उपनिरीक्षक देवकाते आणि जरीपटका पोलिसांच्या पथकाने केली.
पोलिसांचेच अभय?
शहरात कोणताही अवैध धंदा सुरू नको, असे पोलिस आयुक्तांचे आदेश असतानाही कपिलनगर पोलिसांनी त्याकडे कानाडोळाच केल्याचे दिसून येत आहे. ठाण्याच्या आशीवार्दाने हे हुक्का पार्लर सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात असून, येथे डीसीपीला छापा घालावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.