राज्यात १२,५३८ जागांसाठी पोलीस भरती; गृहमंत्र्यांची घोषणा

राज्यातील पोलीस भरतीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे. पोलीस खात्यात १२,५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ५,३०० तर उर्वरित जागा पुढील टप्प्यात भरण्यात येणार आहेत. १२,५३८ जागा भरल्यावरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी भरती केली जाईल अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली.

पोलिस विभागात लाखो जागा रिक्त असतांना पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येत नसल्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांच्या वयात वाढ होत असल्यामुळे सरकारच्या या दिरंगाईमुळे समाजातील अनेक विद्यार्थी, मिळणार असलेल्या रोजगाराच्या संधीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्यात करिता पोलीस दलातील १२ हजार जागांची प्रक्रिया सुरू करण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सोमवार दिनांक ११ ला सकाळी अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यास गेले असता प्रशासनाने आकाशवाणी चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांना जाण्यास सांगितले पुढे प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री येणार आहेत असे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले. पुढे जिल्हाधिकारी यांना गृहमंत्र्यांकडून विचारणा करण्यात आली तेव्हा गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले. गृहमंत्र्यांच्या निवासथानी झालेल्या चर्चेमध्ये महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना मा.ना. अनिल देशमुख यांनी ५,५०० हजार जागांची भरती प्रक्रिया येत्या ८ दिवसात करण्यात येईल नंतर ७,५०० व नंतर ५००० जागांची भरती अशी टप्या टप्याने ३ महिन्याच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येयील अशी खात्री दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.