मराठा आंदोलकांच्या गाडी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, पुढे काय?

Share This News

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याची राजधानी मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलकांच्या गाडी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याची राजधानी मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलकांच्या गाडी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 14 डिसेंबर रोजी राज्यभरातून मंत्रालयावर गाडी मोर्चा धडकणार होता. पुण्यात झालेल्या मराठा मोर्चा समन्वयकांच्या बैठकीत या गाडी मोर्चाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन होणार आहे (Police reject permission for Maratha Morcha in Mumbai amid Corona).

मराठा आंदोलकांनी गाडी मोर्चाला परवानगी नाकारल्याने आता आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 आणि 15 डिसेंबरला हे ठिय्या आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. हे आंदोलक मराठा समाजाच्या पीडित उमेदवारांच्या उपोषणात सहभागी होणार आहेत. आरक्षण स्थगितीपूर्वी एसईबीसी (SEBC) कोट्यातून निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्ती मिळावी या मागणीसाठी आझाद मैदानावर 2 दिवस उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. याच उपोषणात हे मराठा समन्वयक सहभागी होणार आहेत.

दरम्यान, याआधी आक्रमक मराठा समाजाने 8 डिसेंबर रोजी मोर्चाची घोषणा केली होती. मात्र, पुण्यात झालेल्या बैठकीत मोर्चाची तारीख बदलण्यात आली. त्याप्रमाणे विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा मोर्चा विधानभवनावर धडकणार होता. याप्रमाणे आता राज्यभरातून आंदोलक मराठा क्रांती मोर्चासाठी 14 डिसेंबरला आपल्या गाड्यांसह मुंबईत दाखल होणार होते.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून वकिलांची फौज, पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर

दरम्यान, एसईबीसी आरक्षण  प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीबाबत 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी राज्य सरकारकडून पाच वकिलांची फौज तयार करण्यात आली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर 5 वकिलांची ही समन्वय समिती जाहीर केली होती.

अशोक चव्हाण म्हणाले होते, “एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात 5 सदस्यीय घटनापीठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर करण्यात येत आहे. या समन्वय समितीमध्ये अ‍ॅड. आशिष गायकवाड, अ‍ॅड. राजेश टेकाळे, अ‍ॅड. रमेश दुबे पाटील, अ‍ॅड. अनिल गोळेगावकर आणि अ‍ॅड. अभिजीत पाटील यांचा समावेश आहे.”

सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांचे खंडपीठ तयार

दरम्यान, मराठा आरक्षण सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधीशांचे खंडपीठ तयार करण्यात आलं आहे. या खंडपीठात न्यायाधीश अशोक भूषण, एल नागेश्वर राव, एस. अब्दुल, हेमंत गुप्ता आणि एस रवींद्र भट्ट यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाला स्थगिती देणारे न्यायधीश एल नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट्ट यांचा ही पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात समावेश करण्यात आला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.